
दाभोळ : सोलर कुंपणाने जंगली श्वापदे पळतील
दाभोळ : कोकणातील जंगली श्वापदे यांच्याकडून होणाऱ्या उपद्रवाबद्दल अनेकांनी तक्रार केली. यावर उपाय म्हणून सोलर कुंपण योजना प्रस्तावित आहे. मंत्रिमंडळ बैठकीत लवकरच त्याला मंजुरी मिळेल. अव्होकॅडो फळाच्या दापोलीत केलेल्या लागवडीची पाहणी केली आहे. येत्या चार ते वर्षांत याचे चांगले निकाल हाती येतील व आंब्याला हा पर्याय म्हणून पुढे येईल, अशी माहिती कृषिमंत्री दादा भुसे यांनी दिली.
दापोली येथील डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाच्या सुवर्ण पालवी प्रदर्शनाच्या उद्घाटन कार्यक्रम व कोकण विभाग खरीप हंगामपूर्व आढावा बैठकीला ते दापोलीत आले असता, कुलगुरू कार्यालयातील परिषद दालनात त्यांनी पत्रकारांशी
संवाद साधला.
ते म्हणाले, खरीप हंगाम बैठकीमध्ये कोकणातील फळबागांवरदेखील फोकस करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. कोकणामध्ये खतबियाणे व शेतीसाठी लागणारी अवजारे यांची कमतरता भासणार नाही. दर, वजन याबाबत क्वालिटी कंट्रोलनेदेखील सतर्क राहावे, अशा सूचना आपण दिलेल्या आहेत. या बैठकीमध्ये पीक कर्जाबाबतदेखील चर्चा झाली आहे. पेरणीपूर्वी कर्ज लवकरात लवकर शेतकऱ्यांना उपलब्ध व्हावे, याबाबत सूचना दिलेली आहे.
गेल्या वर्षी पीककर्जाबाबत ८५ टक्के टार्गेट पूर्ण झाले होते. या वर्षी १०० टक्के उद्दिष्ट पूर्ण करण्यावर भर राहील. यासाठी जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली दर आठवड्यात बैठका घेण्यात येतील. पत्रकार परिषदेला कुलगुरू डॉ. संजय सावंत, कृषी आयुक्त धीरज कुमार, जिल्हाधिकारी बी. एन. पाटील, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. इंदुराणी जाखड, कृषी विभागाचे अधिकारी उपस्थित होते.बोगस बियाण्यांची विक्री, फौजदारी करणार
कोकणातील पाच जिल्ह्यांची खरीप हंगामाबाबत आढावा बैठक घेण्यात आली असून यामध्ये कोकणातील पाच जिल्ह्यांकरिता लागणारे बी-बियाणे व खते याबाबत सखोल चर्चा करण्यात आली. शिवाय उपयुक्त सूचनादेखील देण्यात आल्या. ज्या दुकानातून बोगस बियाण्यांची विक्री होईल, त्या दुकानदारावर तसेच बियाणे उप्तादक कंपन्यांवर, त्या कंपन्यांच्या संचालकांवर फौजदारी गुन्हे दाखल करण्याचे आदेश दिले आहेत.
नर्सरींच्या बिलांबाबत निर्णय घेऊ
आंबा-काजू नर्सरीबाबत नर्सरीमधील वीजजोडणीबाबत आपण राज्यव्यापी माहिती घेऊ व अशा नर्सरीना वीजबिल कमी येईल, याबाबत ऊर्जामंत्र्यांशी चर्चा करून निर्णय घेऊ, असे दादा भूसे यांनी सांगितले.
नर्सरींच्या बिलांबाबत निर्णय घेऊ
आंबा-काजू नर्सरीबाबत नर्सरीमधील वीजजोडणीबाबत आपण राज्यव्यापी माहिती घेऊ व अशा नर्सरीना वीजबिल कमी येईल, याबाबत ऊर्जामंत्र्यांशी चर्चा करून निर्णय घेऊ, असे दादा भूसे यांनी सांगितले.
Web Title: Dabhol Wild Beasts Run Solar Fence
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..