

milk business rural development
sakal
सरुड : शाहूवाडी तालुक्यातील अगदी शेवटचे टोक आंबाई धनगरवाडा, चांदोली धरणाच्या काठावर व सह्यादी व्याघ्र प्रकल्पाच्या हद्दीवर गावाने हातपाय पसरलेले. गावातले बहुतांशी युवक मुंबईला रोजीरोटीसाठी गेलेले. जे गावात आहेत त्यांचे उदरनिर्वाहाचे साधन म्हणजे दुग्ध व्यवसाय. या धनगरवाड्याच्या कुशीत ११० उंबऱ्यांची वाडी वसली असून, तब्बल ११०० म्हैशी त्यांनी पाळल्या आहेत. गावचे दुष्ठचक्र भेदण्यास दुधाचे अर्थचक्र प्रभावी ठरत आहे.