esakal | जोतिबा मालिकेचा वाद आता मुंबईत तो ही राज दरबारी
sakal

बोलून बातमी शोधा

dakkhancha raja Jotiba serial ishu is now in Mumbai

 बदल केला नाही तर जोतिबा ग्रामस्थांचा विरोध कायम

जोतिबा मालिकेचा वाद आता मुंबईत तो ही राज दरबारी

sakal_logo
By
निवास मोटे

जोतिबा डोंगर (कोल्हापूर) :स्टार प्रवाह या वाहीनीवर सुरू असलेल्या दख्खनचा राजा ज्योतिबा या मालिकेचा वाद आता मुंबईत सूरू आहे . तो ही राज दरबारी.या मालिके संदर्भात शर्मिलाताई ठाकरे , निर्माते महेश कोठारे , चित्रपट सेनेचे अध्यक्ष अमेय खोपकर , राज्याध्यक्ष शालिनी ठाकरे ,जोतिबाचे उपसरपंच शिवाजीराव सांगळे ,  अभ्यासक ग्रामस्थ पुजारी यांची मुंबईत बैठक झाली. त्यात मालिकेबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली . यावेळी  ठाकरे यांनी  ग्रामस्थ पुजारी, अभ्यासक यांच्या सूचनेनुसार मालिकेत बदल करण्याचे आदेश कोठारे व्हिजनला  दिले आहेत .

दरम्यान ,या मालिकेतील चुकीच्या चित्रीकरणाबद्दल पुजारी ग्रामस्थांनी आक्षेप नोंदवला  मालिका  पौराणिक व केदार विजय ग्रंथानुसार असावी अशी मागणी  सुरुवातीपासूनच  होती . कोठारे प्रोडक्शन निर्मित  या मालिकेमधून श्री जोतिबा देवाचे चुकीचे महात्म्य दाखवले जात आहे. याबाबत ग्रामस्थ पुजारी यांनी आंदोलने केली होती .


 महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने याबाबत लाक्षणिक भूमिका बजावत  खळ खट्याक आंदोलनाचा इशारा दिला होता त्यानुसार  महेश कोठारे यांनी  राज ठाकरे यांची भेट घेऊन बैठक करण्याची विनंती केली होती . यानुसार महाराष्ट्र नव निर्माण सेनेचे पदाधिकारी,  अभ्यासक सुनिल आमाने ,रोहीत संभाजी मिटके,  गुरव समाज अध्यक्ष ज्योतिबा डोंगर चे उपसरपंच श्री शिवाजीराव सांगळे यांना कृष्णकुंज  येथे येण्याचे निमंत्रण दिले होते . यानुसार  शर्मिलाताई ठाकरे व चित्रपट सेनेचे अध्यक्ष अमेय खोपकर यांनी सकारात्मक चर्चा केली. या चर्चेमध्ये जोतिबा देवाचा इतिहास कसा चुकीचा दाखविला आहे .

मालिकेमध्ये  चुकीची दृश्ये दर्शवून दिलीत.   महेश कोठारे यांना याबाबतच्या सर्व बाबी आढळून दिल्या व सदर मालिका थांबवावी तसेच मालिकाही पौराणिक स्तरावर केदार विजयग्रंथा नुसारच व्हावी अशी आग्रही भूमिका मांडली . तसेच  दख्खनचा राजा जोतिबा ही मालिका पौराणिक स्थरावर करण्यासाठी दख्खन केदार एंटरटेनमेंट यांना सर्व मदत करू असे आश्वासन  देण्यात आले .


 जोतिबा उपसरपंच  शिवाजीराव सांगळे ,मनसे पन्हाळा तालुका अध्यक्ष विशाल मोरे, पन्हाळा तालुका सचिव लखन लादे उपाध्यक्ष नयन गायकवाड़, कोडोली शहर अध्यक्ष तुषार पोवार, जोतिबा शाखाध्यक्ष रोहीत मिटके, कोल्हापुर शहर विभागीय अध्यक्ष राहुल भाट,शाखाध्यक्ष संदिप चौगले़ तसेच दख्खन केदार एंटरटेन्टमेंट उपस्थित होते.

जोतिबा मालिकेत कोठारे व्हिजनने बैठकीत ठरल्याप्रमाणे तातडीने बदल करावा . बदल केला नाही तर जोतिबा ग्रामस्थांचा विरोध कायम राहील . आम्ही मालिका बंद पाडण्यासाठी संघर्ष करू .

शिवाजीराव सांगळे,  उपसरपंच , जोतिबा डोंगर

संपादन- अर्चना बनगे

loading image
go to top