Ratnagiri Dapoli : लिफ्टसाठी तयार केलेल्या टाकीत डोकावला अन् ठेकेदाराची एक चूक चिमुकल्याच्या महागात पडली, समीरचा दुर्देवी अंत
Dapoli Sub district Hospital : रुग्णालयाच्या नवीन इमारतीचे बांधकाम सुरू असताना लिफ्टच्या रिकाम्या टाकीमध्ये पाणी साचले होते. खेळता खेळता समीर टाकीत पडला आणि पाण्यात बुडून त्याचा मृत्यू झाला.
Dapoli Hospital : दापोली येथील उपजिल्हा रुग्णालयाच्या नव्याने सुरू असलेल्या बांधकामाच्या ठिकाणी लिफ्टसाठी तयार केलेल्या टाकीत पडल्याने ९ वर्षांच्या बालकाचा बुडून मृत्यू झाला. गुरुवारी (ता. १२) दुपारी ही घटना घडली.