

Daulatnagar Vehicle Damage Case
sakal
कोल्हापूर: दारूच्या नशेत घरासमोरील वाहनांची तोडफोड करणाऱ्या सख्ख्या भावांना राजारामपुरी पोलिसांनी अटक केली. गौरव ऊर्फ सोन्या संतोष वडर (वय २६) व लक्ष्मण ऊर्फ देवराज संतोष वडर (२०, तीनबत्ती चौक, दौलतनगर) अशी त्यांची नावे आहेत. कुऱ्हाडीचे घाव घालून दोघांनी भागातील पाच वाहनांचे नुकसान केले होते. दोघांची दहशत मोडीत काढण्यासाठी आज घटनास्थळी पोलिसांनी फिरविले.