
-गौरव डोंगरे
कोल्हापूर : छत्रपती प्रमिलाराजे रुग्णालयात एक रुग्ण दाखल झाला. अंगात रक्त कमी असल्याने त्याला रक्त चढवावे लागणार होते. पण ‘ओ-निगेटिव्ह’ रक्तगटाचे रक्त शासकीय पेढीत नसल्याने याची माहिती ‘ब्लड २४ x ७’ या रक्तदाता ग्रुपला देण्यात आली. ‘व्हॉटस्ॲप’द्वारे हजारो रक्तदात्यांना जोडलेल्या या ग्रुपवरील पोस्ट पाहताच काही वेळात रक्तदाता सीपीआरमध्ये येऊन रक्तदान करून गेला. परजिल्ह्यातून येणाऱ्या रुग्णांनाही या ग्रुपचा असा आधार मिळतो आहे.