Kolhapur Solar Power : अंधाऱ्या रात्रीचा शेवट! सौर कृषी वाहिनीमुळे शेतकऱ्यांना दिवसा सलग आठ तास वीज
Daytime Power Supply : कडाक्याची थंडी, अंधार, हिंस्र प्राणी आणि अपघातांचा धोका आता इतिहासजमा झाला आहे. सौर ऊर्जेमुळे नैसर्गिक वीज निर्मिती होत असून महावितरणवरील ताण कमी झाला आहे.
Farmers working safely in daylight as solar feeder scheme
माजगाव : ‘शेतीला रात्रीची नको, तर दिवसा वीज द्या,’ या मागणीसाठीच्या संघर्षाला यश आले आले असून राज्य सरकारने सौर ऊर्जेच्या माध्यमातून दिवसा वीज देण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे.