माजी खासदार रमेश कत्ती यांचे नाव आघाडीवर; रविवारी होणार शिक्कामोर्तब 

DCC elections It will be sealed on Sunday
DCC elections It will be sealed on Sunday
Updated on: 

बेळगाव : डीसीसी (बेळगाव जिल्हा मध्यवर्ती बॅंक) बॅंकेच्या अध्यक्ष व उपाध्यक्षपदासाठी इच्छूकांच्या मोर्चेबांधणीला वेग आला आहे. येत्या 14 नोहेंबरला निवडणूक होणार असून, निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर कोणाच्या गळ्यात अध्यक्ष व उपाध्यक्षपदाची माळ पडणार आहे, त्याचे औत्सूक्‍य लागले आहे. पण, सध्या माजी खासदार रमेश कत्ती यांचे नाव आघाडीवर आहे. 


रविवारी (ता.14) सकाळी 11 ते दुपारी 1 यावेळेत उमेदवारी अर्ज स्वीकारण्याची प्रक्रिया पार पडेल. त्यानंतर अर्ज छानणी आणि उमेदवारी अर्ज पाठीमागे घेण्याची प्रक्रिया पार पडणार आहे. त्यानंतर मतमोजणी सुरु होईल व सायंकाळी विजयी उमेदवारांची घोषणा केली जाईल. सध्या रमेश कत्ती हे डीसीसी बॅंकेचे अध्यक्ष आहेत. अलिकडे झालेल्या निवडणुकीमध्येही त्यांनी विजय मिळविला आहे. यामुळे त्यांनी परत अध्यक्षपदासाठी फिल्डिंग लावली आहे. उपाध्यक्षपदासाठी तिघांची नावे चर्चेत आहेत. त्यामध्ये सर्वाधिक आघाडीवर राजेंद्र अंकलगी, महांतेश दौड्डगौडर आणि शिवानंद डोनी यांची नावे चर्चेत आहेत. त्यापैकी कोणाच्या गळ्यात विजयाची माळ पडते, हे पाहणे औत्सूक्‍यतेचे ठरले आहे. 

मध्यवर्ती बॅंकेची अलिकडे झाली. काही मतदार संघात बिनविरोध निवड झाली. तर काही ठिकाणी चुरशीने मतदान झाले. त्यामध्ये विजयी सभासदाकडून अध्यक्ष आणि उपाध्यक्षांची निवड केली जाते. त्यानुसार तयारी सुरु करण्यात आली आहे. निवडून आलेल्या सभासदांतर्फे अध्यक्ष आणि उपाध्यक्षांची निवड केली जाते. यामुळे इच्छूकांनी तयारी सुरु केली आहे. मतदारांची मोट बांधून अध्यक्ष आणि उपाध्यक्षपदासाठी तयारी सुरु केली आहे. त्यामुळे यात कोण बाजी मारतो, याकडे साऱ्यांच्या नजरा खिळून आहेत. 

संपादन - अर्चना बनगे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

Madhuri the elephant, whose rehabilitation at Vantara is being sought again by PETA India through the Supreme Court
Gokul Milk Union Election Mahayuti Seat-Sharing Formula
Kolhapur Drought, Six Talukas, District Bank Resolution
32-year-old Vikas Chougale drowned in Kasari River
Marathi News Esakal
www.esakal.com