'डियर तुकोबा' तरुणाईला मार्गदर्शक; दुसऱ्या आवृत्तीचे कोल्हापुरात प्रकाशन

'डियर तुकोबा' या पुस्तकाच्या दुसऱ्या आवृत्तीचे काल कोल्हापुरातील 'शाहू स्मारक भवन' येथे प्रकाशन झाले.
kolhapur
kolhapur
Summary

'डियर तुकोबा' या पुस्तकाच्या दुसऱ्या आवृत्तीचे काल कोल्हापुरातील 'शाहू स्मारक भवन' येथे प्रकाशन झाले.

इचलकरंजीतील तरुण लेखक विनायक होगाडे यांनी लिहलेल्या 'डियर तुकोबा' या पुस्तकाच्या दुसऱ्या आवृत्तीचे काल कोल्हापुरातील 'शाहू स्मारक भवन' येथे प्रकाशन झाले. ज्येष्ठ पत्रकार विजय चोरमारे आणि संत साहित्याचे अभ्यासक अशोक केसरकर यांच्याहस्ते या पुस्तकाचे प्रकाशनं संपन्न झाले. (Dear Tukoba book Publication in Kolhapur)

मधुश्री पब्लिकेशन, पुणे यांची निर्मिती असलेल्या या पुस्तकाची पहिली आवृत्ती अवघ्या एकाच महिन्यात संपली. या पुस्तकाचे पहिले प्रकाशन पुण्यामध्ये ज्येष्ठ साहित्यिक रंगनाथ पठारे यांच्या हस्ते 7 जून रोजी करण्यात आले होते.

kolhapur
मंत्री परबांच्या त्रासाला कंटाळूनच मी बंड केलं, आमदार कदमांचा खुलासा

या पुस्तकाच्या दुसऱ्या आवृत्तीच्या प्रकाशनप्रसंगी प्रमुख पाहुणे विजय चोरमारे यांनी पुस्तकाच्या वेगळेपणावर भाष्य केलं. त्यांनी तुकोबांसंदर्भात आजवर आधुनिक लेखकांनी कशाप्रकारे मांडणी केली आहे आणि हे पुस्तक कशाप्रकारे वेगळे आहे, हे सांगितले. विजय चोरमारे म्हणाले की, "कोल्हापूर जिल्ह्यामध्ये मधल्या तीन दशकांमध्ये नवोदित लेखकांची उणीव होती. तेच तेच लेखक वृत्तपत्रातून वगैरे लिहत होते. मात्र, आता विनायकसारखे तरुण अतिशय दमदारपणे लिहत आहेत, यामुळे आशादायी वाटत आहे.", असे कौतुकोद्गार त्यांनी काढले. पुढे ते म्हणाले की, 'या पुस्तकातील 'मीडिया ट्रायल ऑन तुकोबा' हा कल्पनाविलास फारच सुंदर असून यामधून तुकाराम महाराजांचं आयुष्य उलगडते."

या कार्यक्रमाचे अध्यक्ष अशोक केसरकर यांनी तुकाराम महाराजांच्या सार्वकालिक असण्यावर भाष्य केलं. तसेच तुकोबांच्या वेगवेगळ्या अभंगांचा दाखला देत त्यांनी तुकाराम महाराजांच्या आयुष्याचे वेगवेगळे पैलू उलगडवून दाखवले. तसेच हे पुस्तक अत्यंत वाचनीय असून ते प्रत्येकाने वाचायला हवे, असे आवाहनही त्यांनी केले.

kolhapur
भाजप आमदाराचा शिवसेनेवर निशाणा, म्हणाले.. 'संपवून दाखवलं!

इचलकरंजीतील तरुण लेखक विनायक होगाडे यांचे 'डियर तुकोबा' हे तिसरे पुस्तक आहे. याआधी 'फिलींग अस्वस्थ' नावाचा लेखसंग्रह आणि 'ओह माय गोडसे' ही कादंबरी अशी त्यांची दोन पुस्तके प्रकाशित झालेली आहेत. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक संजय रेंदाळकर यांनी केले तर पाहुण्यांची ओळख सीमा पाटील यांनी करुन दिली. सूत्रसंचालन विभावरी नकाते यांनी केले. या कार्यक्रमाचे स्वागत कृष्णात स्वाती तर आभार नियाज अत्तार यांनी मानले. या कार्यक्रमाला सीमा पाटील, संजय रेंदाळकर, संघसेन जगतकर, अनमोल कोठाडिया, सुजाता म्हेत्रे, निशांत शिंदे आदी उपस्थित होते.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com