भाजप आमदाराचा शिवसेनेवर निशाणा, म्हणाले.. 'संपवून दाखवलं!

BMC निवडणुकीत प्रचार करताना शिवसेनेकडून 'करुन दाखवलं' ही टॅगलाईन वापरण्यात आली होती
bjp vs shivsena
bjp vs shivsena
Summary

BMC निवडणुकीत प्रचार करताना शिवसेनेकडून 'करुन दाखवलं' ही टॅगलाईन वापरण्यात आली होती

विधान परिषदेचा निकाल लागला आणि राज्यातील राजकीय घडामोडींना वेग घेतला. शिवसेना नेते आणि राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेचे ४० आमदार फोडून भाजपसोबत सरकार स्थापन केले आहे. यानंतर महाराष्ट्राच्या राजकारणात अनेक बदल झाले. उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिला आणि महाविकास सरकार कोसळलं. यानंतरही भाजप सेनेतील शाब्दिक युद्ध संपलेलं नाही. दरम्यान, आता भाजप नेते राम कदम यांनी सेनेवर बोचरी टीका केली आहे.

काही दिवसांपूर्वीच भाजप नेते किरीट सोमय्या यांनी उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्यावर टीका केली होती. आता राम कदम यांनी ट्वीट करत शिवसेनेवर निशाणा साधला आहे. यात 'संपवून दाखवलं!' असा मजकूर त्यांनी लिहला आहे. त्यामुळे आता पुन्हा एकदा शिवसेना आणि भाजप यांच्यातील वाद चव्हाट्यावर आला आहे.

bjp vs shivsena
राऊतांच्या आरोपाला सत्तारांंचं उत्तर, म्हणाले आम्हाला किती कोटी दिले?

दरम्यान, मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीत प्रचार करताना शिवसेनेकडून 'करुन दाखवलं' ही टॅगलाईन वापरण्यात आली होती. तोच धागा पकडत राम कदम यांनी 'संपवून दाखवलं' असा मजकूर लिहून शिवसेनेला डिवचले आहे. त्यामुळे आता यावर शिवसेना काय उत्तर देणार पहावे लागणार आहे.

भाजपचे किरीट सोमय्या यांनी नुकतीच उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली होती. सोमय्या यांनी ट्विट करत उद्धव ठाकरेंचा उल्लेख माफिया उद्धव असा केला होता. यावर शिंदे गटाचे प्रवक्ते दीपक केसरकर यांनी तीव्र आक्षेप घेतला होता. किरीट सोमय्या उद्धवजींबाबत जे बोलले ते चुकीचे असल्याचे केसरकर म्हणाले. त्याबद्दल आम्ही ताबडतोब फडणवीसांना सांगितले आहे. फडणवीस याबाबत निर्णय घेतील आणि यापुढे उद्धव ठाकरेंवर टीका होणार नाही, असा दावा दीपक केसरकर यांनी केला होता.

bjp vs shivsena
मी २४ तास जनतेसाठी काम करणारा मुख्यमंत्री - एकनाथ शिंदे

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com