कोल्हापुरातील दूध विक्री बंदचा निर्णय मागे

कोल्हापुरातील दूध विक्री बंदचा निर्णय मागे

कोल्हापूर : गोकूळ दूध (Gokul Milk) घरपोच करताना वितरकांना (Milk Distributors) पोलिसांची अरेरावी सहन करावी लागते. एका जागेवरून विक्रीला परवानगी नाही. या सर्व कारणांमुळे शहरातील वितरकांनी वितरण बंद ठेवण्याचा निर्णय घेतला होता. मात्र गोकूळ संचालक डॉ.सुजीत मिणचेकर (Dr. Sujit Minchekar) यांनी प्रशासनाबरोबर चर्चा केल्यानंतर प्रशासनाने जागेवरून दूध विक्रीसाठी सकारात्मकता दाखवली. त्यानंतर वितरकांनी बंदची भूमिका मागे घेतली. मात्र याबाबत अद्याप कोणतेही लेखी आदेश काढलेले नाहीत.

Decision to stop sale of milk in Kolhapur marathi news

शहरात गोकूळचे रोज सुमारे २ लाख लिटर दूध ग्राहकांनी वितरीत केले जाते. यामध्ये काही ठिकाणी विक्रेते घरपोच सेवा देतात. तर बहुतांशी दूध हे दूकानातून विकले जाते. आठ दिवसांच्या लॉकडाउनच्या काळात विक्रेत्यांनी ग्राहकांना दूधाची घरपोच सेवा देण्याचे आदेश प्रशासनाने दिले होते. मात्र गेल्या तीन दिवसात विक्रेत्यांना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागले. दूध पोहचवण्यासाठी जाताना पोलिस अडवतात. अरेरावीची भाषा करतात. काही जणांवर दंडात्मक कारवाईलाही सामोरे जावे लागले. तसेच दोन लाख लिटर दूधाचे वितरण घरपोच करणे शक्य नाही.

आज सकाळी विक्रेत्यांनी दूध वितरण बंद करणार असल्याचे जाहीर केले. त्यानंतर गोकूळचे नूतन संचालक डॉ.सुजीत मिणचेकर यांनी जिल्हाधिकारी दौलत देसाई आणि पोलिस अधीक्षक शैलेश बलकवडे यांची भेट घेतली. त्यांच्या समोर त्यांनी दूध वितरणातील अडचणी मांडल्या. त्यानंचर प्रशासनाने नरमाईची भूमिका घेऊन एका जागेवरून दूध विक्री करण्यासाठी सकारात्मक प्रतिसाद दिला आहे. मात्र याबाबतचे कोणतेही लेखी आदेश अद्याप दिलेले नाहीत.

शंभर नंबरला कॉल करा

दूध विक्रेत्यांना अडवून नका असे आदेश सर्व पोलिस कर्मचाऱ्यांना देतो असे पोलीस अधीक्षक बलकवडे यांनी डॉ.मिणचेकर यांना सांगितले. त्यातही कोणी अडवलेच तर शंभर नंबरला फोन करा. असेही सांगितले.

Decision to stop sale of milk in Kolhapur marathi news

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com