'स्वाभिमानी' शेतकरी नाही तर राजकीय संघटना : राजू शेट्टींवर घणाघात

Raju Shetti
Raju Shettisakal
Updated on

शिरोळ (कोल्हापूर) : चालू हंगामात कारखान्यांनी ऊस उत्पादकांना एफआरपीनुसार होणारी रक्कम अधिक पाचशे रुपये द्यावेत. गळित हंगाम संपल्यानंतर उर्वरित ५०० रुपये न दिल्यास कायदेशीर लढाईने ऊस उत्पादकांना पाचशे रुपये मिळवून देऊ, असा एल्गार धनाजी चुडमुंगे यांनी केला. आंदोलन अंकुश, जय शिवराय शेतकरी संघटना व बळिराजा शेतकरी संघटनेच्या वतीने येथील छत्रपती शिवाजी महाराज तक्त्यामध्ये पाचवी एल्गार ऊस परिषद घेतली. दरम्यान, शिवाजी माने, बी. जी. पाटील, दीपक पाटील (Deepak Patil)यांनी मनोगत व्यक्त करताना माजी खासदार राजू शेट्टी (Raju Shetti)यांच्यावर घणाघाती टीका केली. स्वाभिमानी शेतकरी संघटना ही शेतकरी संघटना न राहता राजकीय संघटना बनल्याचा आरोप केला.

चुडमुंगे म्हणाले, ‘‘गेल्यावर्षी गाळप केलेल्या उसास एफआरपीची रक्कम अधिक २०० रुपये, कायदेशीर लढाई केल्यास मिळणार आहेत. मात्र यासाठी शेतकऱ्यांचे कैवारी म्हणवून घेणाऱ्या नेत्याने कोणताही आवाज उठवला नाही. जिल्ह्यातील साखर कारखाने एफआरपीची रक्कम एकरकमी देण्यास तयार आहेत, हे यश आंदोलन अंकुशने केलेल्या कायदेशीर लढाईमुळे शक्य झाले आहे. एकरकमी रक्कम १४ दिवसांत न दिल्यास पंधरा टक्के व्याज द्यावे लागणार आहे. यामुळेच कारखाने एकरकमी एफआरपीची रक्कम देत आहेत. भविष्यात नीती आयोगाचे अंमलबजावणी करण्यासाठी कायदेशीर लढाई करण्यात येणार आहे.’’

मुश्रीफांचे आव्हान स्वीकारले

मुश्रीफ यांनी राजू शेट्टी यांना आव्हान न देता ‘आंदोलन अंकुश’ला द्यावे. पुढच्या वर्षी जिल्ह्यातील कोणताही साखर कारखाना ‘आंदोलन अंकुश’ला चालवण्यास द्यावा. ऊस उत्पादक शेतकऱ्यांना किमान चार हजार रुपये देण्याची घोषणा चूडमुंगे यांनी केली. शेट्टी हे आव्हान स्वीकारणार नाहीत, हे गृहीत धरूनच मुश्रीफांनी आव्हान दिले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

Ambabai Temple conservation work allegations
Radhanagari Dam Water Level Reaches 85%
Kolhapur auto rickshaw driver murder latest news
Sadabhau Khot Education
Marathi News Esakal
www.esakal.com