esakal | परीक्षा रद्द झाल्या; मग भरलेले शुल्कही परत करा! ; विद्यार्थ्यांची मागणी  
sakal

बोलून बातमी शोधा

Demand for refund of fees due to cancellation of examination

राज्य सरकारकडून सूचना आल्यानंतर निर्णय घेण्यात येईल, असे आश्‍वासन विद्यापीठाकडून दिले जात आहे.

परीक्षा रद्द झाल्या; मग भरलेले शुल्कही परत करा! ; विद्यार्थ्यांची मागणी  

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

बेळगाव - कोरोनामुळे अंतिम वर्ष वगळता सर्व परीक्षा रद्द झाल्या होत्या. तत्पूर्वी परीक्षा होणार या शक्‍यतेने प्रथम व द्वितीय वर्षाच्या विद्यार्थ्यांचे परीक्षा अर्ज भरुन घेतले होते. परीक्षा रद्द होऊन अडीच महिन्यांचा कालावधी उलटला आहे, तरीही परीक्षा शुल्क परत करण्यासंबंधी राणी चन्नम्मा विद्यापीठाच्या कोणत्याही हालचाली नाहीत. यासंबंधी लवकरच ऑल इंडिया डेमॉक्रेटिक स्टुडंट ऑर्गनायझेशन (एआयडीएसओ) विद्यापीठ व सरकारला निवेदन देणार आहे. 

कोरोनाचे वाढते प्रमाण पाहता राज्य सरकारने खबरदारी म्हणून 10 जुलैला अंतिम वर्ष वगळता सर्व परीक्षा रद्द होतील, असा आदेश बजाविला होता. यामुळे काही विद्यार्थ्यांतून समाधान, तर काहींतून नाराजी दिसून आली होती. सध्या अंतिम वर्षाच्या परीक्षाही अंतिम टप्प्यात आल्या आहेत. यासंबंधी विद्यार्थ्यांकडून विद्यापीठाशी संपर्क साधला असता, राज्य सरकारकडून सूचना आल्यानंतर निर्णय घेण्यात येईल, असे आश्‍वासन विद्यापीठाकडून दिले जात आहे. यामुळे राज्य सरकारने परीक्षा शुल्क परत करण्याबाबत तातडीने निर्णय घेण्याची मागणी होत आहे. विद्यार्थ्यांनी सुमारे 1 हजार रुपयांपासून 2 हजार रुपयांपर्यंत परीक्षा शुल्क भरले आहे. 

राणी चन्नम्मा विद्यापीठाच्या अंतर्गत 300 हून अधिक महाविद्यालये येतात. यात लाखो विद्यार्थी पदवी व पदव्युत्तरचे शिक्षण घेतात. या विद्यार्थ्यांकडून जूनच्या शेवटच्या आठवड्यात परीक्षा अर्ज भरुन घेतला होता. पदवीच्या पहिल्या, दुसऱ्या, तिसऱ्या सेमिस्टर व पदव्युत्तरच्या पहिल्या व दुसऱ्या वर्गातील विद्यार्थ्यांनी ऑनलाईन अर्ज भरला होता. मात्र, यातील पदवीच्या तिसऱ्या व पदव्युत्तरच्या दुसऱ्या सेमिस्टर विद्यार्थ्यांची परीक्षा झाली. त्यामुळे पदवीच्या पहिल्या, दुसऱ्या व पदव्युत्तरच्या पहिल्या वर्षातील विद्यार्थ्यांनी भरलेले परीक्षा शुल्क परत मिळावे, अशी मागणी होत आहे. 

हे पण वाचा - आरटीओतील एजंटगिरीला लागणार चाप  
 
राज्य सरकारच्या सूचनेनुसार तृतीय वर्ष वगळता सर्व परीक्षा रद्द करण्यात आल्या आहेत. अनेक विद्यार्थ्यांनी परीक्षा शुल्क भरले आहे. आता परीक्षा रद्द झाल्या असून विद्यापीठाने परीक्षा शुल्क परत करणे आवश्‍यक आहे. यासाठी आमची संघटना पाठपुरावा करणार आहे. 

-महांतेश बिळ्ळूर, प्रमुख, ऑल इंडिया डेमॉक्रेटिक स्टुडंट ऑर्गनायझेशन, बेळगाव जिल्हा 

हे पण वाचाआरोग्य राज्यमंत्री प्रेमींच्या मनात ठसलाय ; ९८८९ नंबर चांगलाच बसलाय  

संपादन - धनाजी सुर्वे 
 

loading image
go to top