सावधान! डेंगी, चिकनगुण्याचा धोका घोंगावतोय; वेळीच खबरदारी घ्या

महापुरानंतर प्रत्येक गल्ली, कॉलनी आणि परिसरात अनेक रुग्ण आढळून येत आहेत.
सावधान! डेंगी, चिकनगुण्याचा धोका घोंगावतोय; वेळीच खबरदारी घ्या

कोल्हापूर : कोल्हापूर शहर (kolhapur city) आणि परिसरात डेंगी व चिकनगुण्याच्या रुग्णांची संख्या वाढत आहे. (dengue and chikungunya) अंगदुखी, कणकण आणि तापाने रुग्ण फणफणत आहेत. महापुरानंतर प्रत्येक गल्ली, कॉलनी आणि परिसरात अनेक रुग्ण आढळून येत आहेत. कोरोनाच्या (covid-19) कडक निर्बंधांमुळे आर्थिक कंबरडे मोडले असताना पुन्हा डेंगी, चिकनगुण्याचा आणि कोरोनाच्या उपचारांसाठी नागरिकांना मोठ्या प्रमाणात खर्च करावा लागत आहे. त्यामुळे नागरिक अक्षरशः मेटाकुटीला आले आहेत. महापालिकेच्या आरोग्य विभागाकडे मात्र जानेवारीपासून जूनपर्यंत अवघ्या ७४ डेंगीच्या रुग्णांची नोंद आहे. जुलैमध्ये पावसामुळे शोधमोहीमच थंडावली.

शहरातील कोणत्याही खासगी प्रॅक्टिशनरकडे फेरफटका मारा, रुग्णालयाच्या दारात हमखास बहुतांशी रुग्ण तापाचेच आढळून येतील. कोणत्याही खासगी डॉक्टरांना विचारले तर डेंगी आणि चिकनगुण्याचे प्रमाण शहरात आणि परिसरात वाढल्याचे वास्तव आहे. शहरांसोबत शहराच्या आजूबाजूच्या मोठ्या गावांत कळंबा, गांधीनगर, उचगाव, पाचगावमध्येही आजाराने अक्षरशः थैमान घातले आहे. महापालिका असेल अथवा जिल्हा परिषद असेल, त्यांच्याकडे मिळणारी आकडेवारीही परफेक्ट नाही. जिल्हा आरोग्य प्रशासनाला त्याचे गांभीर्य नसल्याचे दिसून येत आहे.

सावधान! डेंगी, चिकनगुण्याचा धोका घोंगावतोय; वेळीच खबरदारी घ्या
गैबी घाटातून प्रवास करताय, मग थोडं जपूनच जा!

आजाराने त्रस्त असणारे रुग्ण आणि नातेवाइकांची मात्र धांदल उडत आहे. एका बाजूला कोरोनचा धोका आणि दुसऱ्या बाजूला डेंगी आणि चिकनगुन्याची फैलावणारी साथ याचा मोठा सामना नागरिकांना करावा लागत आहे. नागरिक अक्षरशः मेटाकुटीला आले आहेत. महापालिका कोरोना महामारीसह इतर आजारांची तपासणी करण्यासाठी घरोघरी जाऊन सर्वेक्षण करत आहे. धूर फवारणी, औषध फवारणी, डेंगीच्या अळ्यांचे निर्मूलन अशा उपाययोजना राबवल्या जात आहेत, मात्र या सर्व उपाययोजनांवर मर्यादा येत आहे. त्यामुळे शहरात डेंगी आणि चिकनगुन्यामुळे नागरिकांचा जीव अक्षरशः मेटाकुटीला आला आहे.

खबरदारी हाच उपाय

डेंगीचे डास हे स्वच्छ पाण्यात असतात. त्यामुळे नागरिकांनी आठवड्यातून एकदा पाण्याची भांडी कोरडी करण्याची आवश्यकता आहे. घरावर टाकले जाणारे स्क्रॅप, वाहनांच्या पायऱ्या, नारळाच्या करंट्यांत पावसाचे पाणी साचते. त्या डासांची निर्मिती होते. नागरिकांच्या आरोग्याच्या दृष्टीने तेच घातक आहे. त्यामुळे नागरिकांनी काळजी घ्यावी. परिसरात जर पाण्याची डबकी अथवा पाणवठे असतील तर त्यात गप्पी मासे सोडावेत, असे आवाहन महापालिकेच्या आरोग्य विभागाने केले आहे.

सावधान! डेंगी, चिकनगुण्याचा धोका घोंगावतोय; वेळीच खबरदारी घ्या
फेसबुकवरून फर्निचर शाॅपिंग पडले महागात; 3 लाखांचा फटका

"महापालिका धूर फवारणी, औषध फवारणी करीत आहे. महापुरानंतर रुग्णांची संख्या वाढते. महापालिका पुन्हा शोधमोहीम घेत आहे. लक्षणे दिसताच नागरिकांनी तपासणी करावी. महापालिकेच्या सावित्रीबाई फुले रुग्णालयात उपचारांची व्यवस्था आहे. डेंगी, चिकनगुण्यासारख्या साथीच्या आजारांची माहिती महापालिकेला देणे बंधनकारक आहे. त्याबाबतच्या सक्त सूचना महापालिकेच्या आरोग्य विभागाने खासगी रुग्णालयांना दिल्या आहेत."

- डॉ. रमेश जाधव, साथरोग अधिकारी

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com