पशुसंवर्धन विभागाचा जिल्‍ह्यावर अन्याय; 'या दोन योजनांवर' मारली फुली | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

पशुसंवर्धन विभागाचा जिल्‍ह्यावर अन्याय; 'या दोन योजनांवर' मारली फुली

पशुसंवर्धन विभागाचा जिल्‍ह्यावर अन्याय; 'या दोन योजनांवर' मारली फुली

कोल्‍हापूर : राज्याच्या पशुसंवर्धन विभागाकडून नावीन्यपूर्ण योजनेत खुल्या गटातील लाभार्थीस २,४, ६ गायी किंवा म्‍हशीच्या गटास ५० टक्‍के तर अनुसूचित जाती, नवबौद्ध घटकातील लाभार्थीस ७५ टक्‍के अनुदान दिले जाते. मराठवाडा पॅकेज अंतर्गत सर्वसाधारण प्रवर्गातील शेतकऱ्यांसाठी ५० टक्‍के अनुदानावर २ दुधाळ जनावरे घेण्यास अनुदान दिले जाते. मात्र या दोन्‍ही योजनेत जिल्‍ह्यावर फुली मारली आहे. या दोन्‍ही योजनांचा लाभ जिल्‍ह्याला मिळाला तर दरवर्षी किमान १५ ते २० कोटीचे अनुदान जिल्‍ह्याला मिळण्याची शक्यता असून दूध उत्‍पादनही भरघोस वाढू शकेल, असा विश्‍‍वास पशुसंवर्धन विभागाकडून व्यक्‍त करण्यात येत आहे. मात्र योजना राबवण्यासाठी दोन्‍ही मंत्र्यांनी यासाठी प्रयत्‍न करणे आवश्यक आहे. department-of-animal-husbandry-Milk-cattle-the-benefit-of-group-distribution-both-schemes-cancelled

राज्यात २०१७़-१८ पासून मराठवाडा पॅकेजची अंमलबजावणी सुरू आहे. सुरुवातीला मराठवाड्यातील जिल्‍ह्यांचा समावेश करत असतानाच पुढे विदर्भातीलही काही जिल्‍ह्यांचा समावेश झाला. सातारा जिल्‍ह्याचाही समावेश केला. योजनेंतर्गत शेतीपूरक व्यवसाय करणाऱ्या शेतकऱ्यांना २ देशी किंवा संकरित गाई आणि २ म्हशींचा गट वाटप करण्यात येतो. ही योजना सर्व प्रवर्गासाठी आहे. या गटाच्या खरेदीसाठी शेतकऱ्याला ५० टक्‍के अनुदान दिले जाते. २ गाय खरेदीसाठी ५६ हजार तर २ म्‍हैस खरेदीसाठी ६६ हजार रुपये अनुदान देण्यात येते. सर्वसाधारणपणे योजनेचा लाभ घेणाऱ्या जिल्‍ह्यांना दरवर्षी ८ ते १० कोटीचे अनुदान मिळते. तर किमान २ हजार शेतकऱ्यांना लाभ होतो. महादेव जानकर दुग्‍धविकास मंत्री असताना योजनेत सातारा जिल्ह्याचाही समावेश केला.

नावीन्यपूर्ण योजनेच्या माध्यमातूनही शेतकऱ्यांना दोन, चार, सहा गायी किंवा म्हशी खरेदीसाठी योजना राबवली जात आहे. पशुसंवर्धन विभागाच्या दोन्‍ही योजनांत जिल्‍ह्याचा समावेश करायचा झाल्यास पालकमंत्री सतेज पाटील व ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनाच ताकत लावावी लागणार आहे.

हेही वाचा- Good News:महाडीबीटीचा राज्यात सर्वप्रथम कोल्हापूरातील शेतकऱ्यांना लाभ; बँक खात्यात इतके अनुदान जमा

जिल्‍ह्यात मुबलक चारा, पाणी, पोषक हवामान आहे. त्यामुळे दूध उत्‍पादन वाढीला संधी आहे. मात्र सद्यःस्‍थितीत जनावरांच्या किमती वाढल्या आहेत. शेतकऱ्याला या किमती परवडणाऱ्या नाहीत. त्यामुळे शासनाच्या योजनेचाच मोठा आधार आहे. शासन पातळीवर प्रयत्‍न सुरू असले तरी त्याला मर्यादा आहेत.

डॉ. विनोद पवार, जिल्‍हा पशुसंवर्धन अधिकारी, जिल्‍हा परिषद

Web Title: Department Of Animal Husbandry Milk Cattle The Benefit Of Group Distribution Both Schemes

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top