"कोल्हापुरात ‘आयटीहब’ उभारण्याचा निर्णय घेण्यात आला. यातून युवकांना स्थानिक पातळीवर रोजगार उपलब्ध होणार आहे.’’
कोल्हापूर : कोल्हापुरातील शेंडापार्क येथे ‘आयटीहब’ उभारण्यासाठी कृषी विद्यापीठाची (Agricultural University) ३४ हेक्टर जागा हस्तांतरित करण्यात येणार आहे. त्यामुळे कृषी विद्यापीठाला शेती, शिक्षण, संशोधन यासाठी ६० ते १०० हेक्टर पर्यायी जागा लागेल. त्या जागेचा येत्या दहा दिवसांत शोध घ्या, असे निर्देश उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी मुंबईत आयोजित बैठकीत दिले. या निर्देशामुळे कोल्हापुरातील शेंडापार्क येथे ‘आयटीहब’ निर्माण होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.