प्रत्येक जिल्ह्याला राजशिष्टाचार (प्रोटोकॉल) विभाग असतो. या विभागाच्या माध्यमातून येणारे मंत्री व अन्य अतिमहत्त्वाच्या व्यक्तींच्या दौऱ्यातील सारी व्यवस्था केली जाते.
कोल्हापूर : ‘कलेक्टर नवीन गाडी घ्या की, कुणाकडे प्रस्ताव दिलाय मला सांगा. आत्ता सही करून मंजूर करून देतो,’ असे सांगून उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी जिल्हाधिकाऱ्यांना प्रोटोकॉल विभागासाठी नवीन गाडी घेण्याचे आदेश दिले. मंत्री पवार यांना घेण्यासाठी जी शासकीय गाडी गेली होती ती त्यांना पसंत पडली नाही. त्यामुळे त्यांनी आपली नाराजी व्यक्त केली. विविध विकासकामांचा आढावा घेण्यासाठी मंत्री अजित पवार जिल्हाधिकारी कार्यालयात आले होते.