Eknath Shinde Pandharpur Visit : 'विठुराया दुष्काळाचं संकट दूर होऊदे'; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे विठ्ठल-रुक्मिणीला साकडे

Pandharpur Kartiki Ekadashi : कार्तिकी एकादशीनिमित्त उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पंढरपुरात विठ्ठल-रुक्मिणीचे दर्शन घेतले. राज्यावरील दुष्काळाचे संकट दूर होऊ दे, असे साकडे त्यांनी विठुरायाला घातले.
Eknath Shinde Pandharpur Visit kartiki ekadashi

Eknath Shinde Pandharpur Visit kartiki ekadashi

esakal

Updated on: 

Eknath Shinde Vitthal Rukmini Darshan : कार्तिकी एकादशीनिमित्त पंढरपूरच्या विठ्ठल मंदिरात पहाटे भक्तिमय वातावरणात शासकीय महापूजा संपन्न झाली. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पत्नीसमवेत पहाटे अडीच वाजता विठ्ठल-रुक्मिणीची पूजा केली. यावेळी नांदेड जिल्ह्यातील शेतकरी दाम्पत्याला वारकरी प्रतिनिधी म्हणून महापूजेचा मान मिळाला. विठुरायाच्या दर्शनासाठी पंढरपुरात भाविकांनी मोठी गर्दी केली असून, हरिनामाच्या जयघोषाने अवघी पंढरी दुमदुमली आहे.

Loading content, please wait...