Eknath Shinde: खासगी रुग्णालय नोंदणीचा प्रश्न मार्गी लावू : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे; डॉक्टरांच्या शिष्टमंडळाने घेतली भेट
केंद्र सरकारच्या वैद्यकीय मिशनद्वारे सूचित केल्याप्रमाणे कर्मचारी संख्या खासगी रुग्णालयात त्वरित उपलब्ध करणे अवघड आहे. नर्सिंग कर्मचारी हे प्रशिक्षित व नर्सिंग कौन्सिलकडे नोंदणीकृत असणे अत्यंत अडचणीचे आहे.
कोल्हापूर : ‘खासगी रुग्णालय नोंदणीचा प्रश्न तातडीने मार्गी लावला जाईल’, असे आश्वासन सोमवारी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी खासगी हॉस्पिटल आणि नर्सिंग होम असोसिएशनच्या डॉक्टरांच्या शिष्टमंडळाला येथे दिले.