Zilla Parishad Building : जिल्हा परिषदेच्या इमारतीत उपअभियंत्यांच्या सहीने मुलाला दिला भाड्याने गाळा; नियम, परवानगी धाब्यावर
Zilla Parishad Building Case : जिल्हा परिषदेच्या भाऊसिंगजी रोडवरील शॉपिंग कॉम्प्लेक्समधील गाळे न्यायालयीन प्रक्रियेत आहेत. हे गाळे भाडे देत असताना त्याला जिल्हा परिषदेच्या विविध विभागांची परवानगी घ्यावी लागते.
कोल्हापूर : भवानी मंडप ते सीपीआर रुग्णालयापर्यंतचा व्यावसायिकदृष्ट्या महत्त्वाच्या असणाऱ्या भाऊसिंगजी रोडवर जिल्हा परिषदेचे शॉपिंग कॉम्प्लेक्स आहेत. या रस्त्यावर असणाऱ्या दुकान गाळ्यांना सर्वसाधारण २० हजार ते २१ हजार रुपयांपर्यंत महिना भाडे आहे.