esakal | Sakal - Read Latest Breaking Marathi News from Maharashtra India & Around the World
sakal

बोलून बातमी शोधा

kolhapur

ई-पास दर्शनामुळे भाविक संतापले; जोतिबा डोंगरावर भरउन्हात रांगा

sakal_logo
By
निवास मोटे

जोतिबा डोंगर : कोरोना संसर्गामुळे बंद असलेले दख्खनचा राजा श्री जोतिबा देवाचे मंदिर काल तब्बल आठ महिन्यानी उघडण्यात आले . यावेळी ग्रामस्थ भाविकांनी जोतिबाच्या नावानं चांगभलचा जयघोष केला . पण E पास पध्दतीने दर्शन असलेने काल पासून अनेक भाविक गोंधळुन गेले आहेत.नेटवर्क कमी जास्त होत असल्याने यंत्रणा हळू हळू सुरू होती. परिणामी, भाविकांना भर उन्हात ताटकळत उभे राहावे लागले. अनेक वयोवृद्ध भाविकांनी आधार कार्ड आणले नसल्याने त्यांना केवळ कळस दर्शनावरच समाधान मानून घरी परतावे लागले. लहान मुलांना प्रवेश नसल्याने त्यांना पार्किंगच्या ठिकाणी थांबवावे लागले. असे हे चित्र डोंगरावर काल पासून पाहावयास मिळत आहे. या E पास दर्शन पध्दतीने भाविक संतप्त झाले असून ही पद्धत बंद करण्याची मागणी भाविकातून होत आहे.

ज्योतिबा दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांना सकाळी पहाटेपासून ते रात्री एक या वेळेत नियम व अटी नुसार नियमाचे पालन करून दर्शनासाठी खुले करण्यात आले. काल पहाटे दोन वाजताच काही भाविकांचे आगमन झाले. यावेळी E पास काढलेले सांगली जिल्हातील धनंजय उदय साळुंखे यांना पहिला लाभ मिळाला.यामध्ये दर्शना विषयी कोणतेही धार्मिक विधी, होमहवन पुजा, अभिषेक भक्ताना करता येणार नाहीत. देवस्थान समिती यामध्ये शासकीय नियमाप्रमाणे कालानुरूप आवश्यक ते बदल केले जाणार आहेत.

हेही वाचा: अंबाबाई मंदिरात बॉम्ब ठेवल्याचा फोन कॉल दारुच्या नशेत; दोघेजण ताब्यात

मंदिरात प्रवेश करण्यापुर्वी भाविकांनी तोंडावर मास्क लावून प्रवेश करने बंधनकारक अाहे. धार्मिक कार्यक्रम परंपरेनुसार केले जातील. त्या व्यतिरिक्त अन्य कार्यक्रमास पूर्णपणे बंदी राहील. मंदिरामध्ये सतत स्वच्छता कर्मचारी कार्यरत राहणार असून सकाळी दर्शनापूर्वी, दर्शन मार्ग व दर्शनाची जागा सॅनिटायझर करण्यात येणार आहे. अत्यावशक सेवेसाठी मंदिराच्या शेजारी एक ॲम्बुलन्स ची सोय करण्यात आली आहे. तसेच मंदिरांमध्ये असलेल्या प्राथमिक उपचार केंद्रामध्ये आवश्यकतेनुसार डॉक्टर उपलब्ध करण्यात आले आहे. भाविकांनी दर्शन करतेवेळी दर्शन रांगेत ६ फूटअंतर ठेवावे लागणार आहे.

मंदिराबाहेर कोरोना रोगाचे अनुषंगाने सूचना फलक लावले असून, त्याप्रमाणे भाविकांनी सूचनांचे पालन करून देवस्थान समिती व प्रशासनास सहकार्य करावे.फक्त दर्शन घेण्यासाठी मंदिरामध्ये प्रवेश करून समितीस सहकार्य करावे. तसेच भाविकांचे दर्शन झाल्यानंतर त्यांनी तात्काळ मंदिरातून बाहेर जावे. मंदिरात, मंदिराच्या आवारामध्ये बसू नये जेणेकरून गर्दी होणार नाही. स्वच्छता राखणे, भाविकांना चांगल्या प्रकारे दर्शन देणे कामीदेवस्थान समिती अावश्यक ती काळजी घेत आहे व त्यास भाविकांनी सहकार्य करून मंदिर आवारामध्ये गर्दी करु नये. असे अवाहन प्रशासनाने केले आहे.ज्योतिबाचे दर्शन घेण्यासाठी आता भाविक आसुसलेले दिसत आहे. चांगभलची ललकारी काल पासून कानावर पडू लागली अाहे.

loading image
go to top