चैत्र यात्रेला ज्यांना येता आले नाही त्या भाविकांनी आज गर्दी केली. शनिवारपासूनच पुजाऱ्यांच्या घरी भाविकांनी गर्दी केली. मंदिरात काकड आरती मंगलपाठ, केदार स्रोत्र, केदार महिमा या विधींचे पठन झाले.
Devotees at Jyotiba Hill Celebrate with “Chang Bhal” Chants, Creating a Mini Chaitra Yatra AtmosphereSakal
जोतिबा डोंगर : ‘जोतिबाच्या नावानं चांगभलं...’च्या जयघोषात श्री क्षेत्र वाडीरत्नागिरी तथा जोतिबा डोंगर येथे रविवारची यात्रा भक्तिमय वातावरणात झाली. मे महिन्याच्या सुट्या तसेच लग्नसराईमुळे आज जोतिबा डोंगराला मिनी चैत्र यात्रेचे स्वरूप प्राप्त झाले.