जयसिंगपूर : ‘कोल्हापूर, सांगली जिल्ह्यांना महापुराचा मोठा फटका बसतो. आलमट्टी धरणाची (Almatti Dam) उंची वाढविल्यास पुन्हा धोका वाढणार असूनही महाराष्ट्र शासनाकडून याला म्हणावा असा विरोध होताना दिसत नाही. आता लोकसहभागातून याला विरोध करणार आहे. पंतप्रधान, मुख्यमंत्री, पाटबंधारे मंत्र्यांसह, अधिकाऱ्यांना जिल्ह्यातून हजारो पत्रे पाठविण्याची मोहीम हाती घेतली जाणार आहे. मंगळवारी (ता. १५) सायंकाळी सहा वाजता मोहिमेचा प्रारंभ करण्यात येणार असल्याची माहिती ‘आंदोलन अंकुश’चे प्रमुख धनाजी चुडमुंगे यांनी दिली.