Dhananjay Mahadik vs Satej Patil
esakal
कोल्हापूर
Kolhapur Politics : 'आमदार सतेज पाटील यांनी कोल्हापूरला 50 वर्षे मागे नेले'; खासदार धनंजय महाडिक यांचा आरोप
Dhananjay Mahadik’s Strong Allegations Against Satej Patil : खासदार धनंजय महाडिक यांनी आमदार सतेज पाटील यांच्यावर टीका करत, कोल्हापूरच्या विकासकामांतील अपयशावर आरोप केले.
कोल्हापूर : ‘महापालिकेवर (Kolhapur Politics) वर्षानुवर्षे सत्ता असूनही शहरामध्ये कोणतीही भरीव विकासकामे आमदार सतेज पाटील यांनी केलेली नाहीत. खराब रस्ते, वाहतूक कोंडी, अनियमित पाणीपुरवठा या समस्या तशाच आहेत. थेट पाईपलाईनसारखी योजना पूर्ण करण्यास त्यांना १४ वर्षे लागली. त्यांनी कोल्हापूरला ५० वर्षे मागे नेले,’ असा आरोप खासदार धनंजय महाडिक (Dhananjay Mahadik) यांनी केला. लक्ष्मीपुरी भाजप मंडलच्या फराळ कार्यक्रमात ते बोलत होते. अक्कमहादेवी मंटपमध्ये हा कार्यक्रम झाला. यावेळी महेश जाधव यांची प्रमुख उपस्थिती होती.
