शाहूवाडीत 180 रुणांना डिस्चार्ज; 1469 क्वारंटाईन कक्षात 

Discharge to 180 runes in Shahuwadi
Discharge to 180 runes in Shahuwadi

आंबा : जिल्ह्यात कोरोनाचा हॉटस्पॉट असलेल्या शाहूवाडी तालुक्‍यातील पॉझिटिव्ह 180 रुग्ण पूर्णपणे बरे झाले आहेत. शंभर टक्के रुग्णांना डिस्चार्ज दिला आहे. एकही पॉझिटिव्ह रुग्ण राहिलेला नसल्यामुळे तालुकावासीयांना दिलासा मिळाला आहे. तालुक्‍याची कोरोनामुक्तीच्या दिशेने यशस्वी वाटचाल सुरू आहे. 

मुंबई, पुणे व अन्य ठिकाणांहून आलेल्या 181 नागरिक बाधीत होते. कडवे पैकी लाळेवाडी येथील महिलेचा मृत्यू झाला होता. उचत येथील स्थानिक दोघे सोडल्यास तालुक्‍यातील एकाही नागरिकास कोरोनाची लागण झालेली नाही. 

शाहूवाडीचे उपविभागीय अधिकारी बी. आर. माळी, तहसीलदार गुरु बिराजदार, आरोग्य सभापती हंबीरराव पाटील, गटविकास अधिकारी अनिल वाघमारे, तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. एच. आर. निरंकारी, ग्रामीण रुग्णालयाच्या वैद्यकीय अधीक्षक डॉ. सुनंदा गायकवाड, पोलिस निरीक्षक प्रवीण चौगुले, सहाय्यक निरीक्षक भालचंद्र देशमुख, गटशिक्षणाधिकारी उदय सरनाईक, विस्तार अधिकारी सुधीर खाडे, आरोग्य सहायक सुभाष यादव, डॉक्‍टर्स, मलकापूर नगरपालिका व बांधकाम विभागातील कर्मचारी आणि गावोगावच्या दक्षता समित्यांनी घेतलेल्या परिश्रमामुळे कोरोनाच्या संकटावर मात करण्यात यश आले. 

आजअखेर तालुक्‍यात मुंबई व अन्य भागांतून 22 हजार 3000 नागरिक आले आहेत. यापैकी वीस हजारांहून अधिक नागरिकांचा अठ्ठावीस दिवसांचा क्वारंटाइन कालावधी संपला आहे. केवळ 1469 नागरिक क्वारंटाइन असल्याचे तहसीलदार बिराजदार यांनी सांगितले. 

दृष्टिक्षेप
- एकही पॉझिटिव्ह नसल्यामुळे तालुकावासीयांना दिलासा
- मुंबई, पुणे व अन्य ठिकाणांहून आलेले 181 जण होते बाधीत 
- दक्षता समित्यांनी घेतले परिश्रम
- मुंबई व अन्य भागांतून 22 हजार 3000 नागरिक आले

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com