कोणाला तरी सांभाळण्यासाठी बँकेची निवडणूक लादली; विद्यमान संचालकांचा आरोप

गोकुळमध्ये निवडणूक पाहिजे, बँकेत का नको? बाबासाहेब पाटील- आसुरलेकर
Bank Election
Bank ElectionEsakal
Updated on

कोल्हापूर : जिल्हा बँक (Bank Election)चांगली चालली आहे यात दुमत नाही. गोकुळ पण चांगलच चाललं होतं. त्या संस्थेत निवडणूक का लावली. गोकुळमध्ये निवडणूक पाहिजे आणि बँकेत नको असे का? असाही सवाल मान्यवरांनी आज केला. तर, कोणाला तरी सांभाळण्यासाठी, कोणाला तरी मान देण्यासाठी बिनविरोध निवडणूक टाळली असल्याचा आरोप बँकेचे विद्यमान संचालक बाबासाहेब पाटील- आसुरलेकर (Babasaheb Patil- Asurlekar) यांनी केला.

कोल्हापूर (Kolhapur)जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर आज कळंबा (Kalmba)येथे शिवसेना प्रणित राजर्षी शाहू शेतकरी परिवर्तन विकास आघाडीचा मेळावा झाला. करवीर, गगनबावडा, पन्हाळा आणि कोल्हापूर शहरातील ठरावदार मतदारांचा मेळावा सुरू आहे. यावेळी ते बोलत होते.

गोकुळ संचालक अजित नरके म्हणाले, जिल्हा बँकेच्या निवडणुकीसाठी बँकेच्या मतदारांनी भरभरून साथ दिली आहे. सर्वांचाच पाठिंबा मिळत आहे.

Bank Election
सतीश सावंतांच्या मोबाईलवर रिंग वाजताच मतदान केंद्रावर बाचाबाची

शेकापचे केरबा पाटील म्हणाले, ज्यांनी बँक अडचणीत आणली तेच सांगताहेत, जिल्हा बँक चांगली चालली आहे. बँक चांगली चालली आहेत यात दुमत नाही. गोकुळ पण चांगल च चाललं होतं. त्या संस्थेत निवडणूक का लावली. असाही सवाल केला. गोकुळ मध्ये निवडणूक पाहिजे आणि बँकेत नको असे का? असाही सवाल पाटील यांनी केला.

यावेळी खासदार संजय मंडलिक, आमदार प्रकाश आबीटकर, माजी आमदार चंद्रदीप नरके, माजी आमदार सुजित मिणचेकर, माजी आमदार सत्यजीत पाटील, माजी आमदार संपतराव पवार-पाटील, माजी आमदार उल्लास पाटील, शिवसेना जिल्हा प्रमुख संजय पवार, विजय देवणे, प्रा. शहाजी कांबळे, बाबासाहेब पाटील- आसुर्लेकर, गोकुळ संचालक अजित नरके, एस. आर. पाटील, रवी मडके उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

Rare bird discovered in Maharashtra forest
Nandwal temple nirmalya recycling project
Rising Tourist Footfall at Rautwadi Waterfall
Design of Kolhapur Cricket Stadium
Marathi News Esakal
www.esakal.com