रूग्णालयांनी जादा बील घेतल्यास शिवसेनेशी गाठ... कोणी दिला इशारा वाचा...

District Chief Sanjay Pawar caveat for Hospitals that  extra charge covid patient
District Chief Sanjay Pawar caveat for Hospitals that extra charge covid patient
Updated on: 

कोल्हापूर :  कोरोना रुग्णांच्या उपचारासाठी जादा शुल्क आकारणाऱ्या रुग्णालयांना शिवसेना वठणीवर आणल्याशिवाय राहणार नाही, असा इशारा जिल्हाप्रमुख संजय पवार यांनी आज 
दिला. प्रबोधन फलकामुळे गरिबांची लूट निश्‍चितपणे थांबेल, असा विश्‍वास जिल्हाप्रमुख विजय देवणे यांनी व्यक्त केला.
जाहीर फलक लावण्यास आजपासून सुरवात झाली. यासाठी हेल्पलाईन क्रमांक शिवसेनेने दिला असून त्यावर संपर्क साधण्याचे आवाहन पदाधिकाऱ्यांनी केले.


सर्वसाधारण बेडसाठी चार हजार रुपये, आयसीयू बेडसाठी सात हजार ५००, व्हेंटिलेटरसह आयसीयू बेडसाठी नऊ हजार इतके दर निश्‍चित केले आहेत. त्यापेक्षा अधिक शुल्क रुग्णालयांना आकारू नये. शासनाने कोरोना रुग्णांच्या उपचारासाठी दर निश्‍चित केले आहेत. त्यापेक्षा जादा दर आकारले जात असल्याची तक्रारी आहेत. सर्वच रुग्णालयात असा प्रकार होतो असे नाही पण ज्या रुग्ग्णालयात लूट होत असेल तर शिवसेना वठणीवर आणेल असा इशारा पवार यांनी दिला.


दरम्यान, देवणे यांनी कोविड उपचारसाठीची रुग्णालये निश्‍चित आहेत. महात्मा फुले जनआरोग्य योजनेतून उपचार होतात त्याचाही जनतेने लाभ घ्यावा, प्रबोधन फलकांमुळे गरिबांची होणारी लूट निश्‍चितपणे थांबेल.शिवाजी जाधव, सुजित चव्हाण, मंजित माने, तुकाराम लाखे, अभिजीत बुकशेट,  प्रसाद आडनाईक, नीलेश जाधव, प्रवीण पालव आदि उपस्थित होते.

संपादन - अर्चना बनगे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

Kolhapur Drought, Six Talukas, District Bank Resolution
32-year-old Vikas Chougale drowned in Kasari River
Pune MLC Election, Graduate Teacher Seats,
Maharashtra sugar season
Marathi News Esakal
www.esakal.com