
कोल्हापूर : वैद्यकीय अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी घेतली जाणारी राष्ट्रीय पात्रता व प्रवेश परीक्षा (नीट) आज झाली. यासाठी जिल्ह्यात १३ केंद्रांवर सुमारे सहा हजार ४२६ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. नोंदणी केलेल्या विद्यार्थ्यांपैकी १३० विद्यार्थी गैरहजर होते.