
Kolhapur Collector : उदगाव (ता. शिरोळ) येथील वैकुंठधाम स्मशानभूमीतील अघोरी कृत्याची थेट जिल्हाधिकाऱ्यांनीच गंभीर दखल घेतली आहे. या प्रकरणाचा सविस्तर अहवाल सादर करण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी समाज कल्याण विभागामार्फत जयसिंगपूर पोलिसांना दिले आहेत. मात्र, याप्रकरणी फिर्याद देण्यासाठी कोणीही पुढे येत नसल्याने पोलिसांची मात्र चांगलीच कोंडी झाली आहे.