दूध संस्थांमुळे शिरोळच्या शेतकऱ्यांची दिवाळी गोड

Diwali For Shirol Farmers Is A Relief Due To Milk Institutes Kolhapur Marathi news
Diwali For Shirol Farmers Is A Relief Due To Milk Institutes Kolhapur Marathi news
Updated on

शिरोळ : शिरोळ तालुक्‍यातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांना एकरकमी एफआरपीची रक्‍कम मिळाली आहे. तथापि जोडधंदा म्हणून दुग्ध व्यवसाय करणाऱ्या शेतकऱ्यांना व शेतमजुरांना दूध संस्थांकडून दिला जाणारा बोनस व ठेवीवरील व्याजाची रक्‍कम दिवाळी गोड करण्यास मदतीची ठरत आहे. तालुक्‍यातील दूध संस्थांनी 6 कोटी रुपयांहून अधिक रुपये डिव्हीडंट व ठेव फरकावरील व्याज व ठेवीची रक्‍कम दिली आहे. यामुळे जोडधंदा म्हणून दुग्ध व्यवसाय करणाऱ्या शेतकरी व शेतमजुरांची ही दिवाळी उत्साहात होत आहे. 

ऊस उत्पादक शेतकऱ्यांना शिरोळ तालुक्‍यातील साखर कारखान्यांनी एफआरपीइतकीच रक्‍कम शेतकऱ्यांच्या खात्यावर यापूर्वी जमा केली आहे. अंतिम बिलाबाबत कोणत्याही साखर कारखान्याने अद्याप धोरण जाहीर केले नाही. यामुळे ऊस उत्पादक शेतकरी व शेतमजूर जोडधंदा म्हणून दुग्ध व्यवसाय करतात. त्यांना सहकारी दूध संस्थामार्फत बोनस व ठेव कपातीवरील व्याजासह रक्‍कम दिवाळीपूर्वी आदा करण्यात येते. 

जिल्हा दूध संघाकडून म्हैस दुधासाठी प्रति लिटर 1.95 रुपये व गायीच्या दुधासाठी प्रति लिटर 1 रुपये याप्रमाणे दूध फरकाची रक्‍कम दूध संस्थांना आदा केली आहे. शिरोळ तालुक्‍यामध्ये 150 सहकारी दूध उत्पादक संस्था आहेत. या संस्थेपैकी बहुतांश संस्था दहा दिवसाच्या बिलातून ठेव म्हणून 10 टक्‍के रक्‍कम कपात करून घेतात.

दूध उत्पादक शेतकऱ्यांनाही यामुळे बचतीची सवय लागली आहे. जिल्हा दूध संघाकडून आलेला फरक व संस्थेकडील नफा याची बेरीज करून प्रत्येक संस्थेने म्हैस दुधासाठी प्रति लिटर 4 रुपयांहून अधिक बोनस, तसेच ठेव कपातीवरील 6 टक्‍केप्रमाणे व्याज व ठेव रक्‍कम प्रत्येक वर्षी दिवाळीला दूध उत्पादकांना दिली जात आहे. तालुक्‍यामध्ये सुमारे 6 कोटी रुपयांहून अधिक रक्‍कम दूध उत्पादकांना मिळाली आहे. यामुळे जे शेतकरी व शेतमजूर जोडधंदा म्हणून दुग्ध व्यवसाय करतात त्यांची दिवाळी गोड झाली आहे. 

संपादन - सचिन चराटी

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com