लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने तातडीने सापळा रचला. इंद्रजितला तक्रारदाराकडून आठ हजार रुपये घेताना पकडले. याप्रकरणी डॉ. पाटोळे व इंद्रजित पाटोळेविरोधात गडहिंग्लज पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद करण्याची प्रक्रिया रात्री उशिरापर्यंत सुरू होती.
गडहिंग्लज : महात्मा जोतिबा फुले जनआरोग्य योजनेतून (Mahatma Jyotiba Phule Jan Arogya Yojana) मोफत उपचार करण्यासाठी डॉक्टरच्या (Doctor) सांगण्यावरून आठ हजारांची लाच घेताना येथील स्वराज्य मल्टिस्पेशालिटी रुग्णालयाच्या प्रशासकाला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या (Anti-Corruption Department) पथकाने पकडले. याप्रकरणी या रुग्णालयाचे प्रमुख डॉ. अजित वसंतराव पाटोळे (वय ४८) व प्रशासक इंद्रजित शिवाजीराव पाटोळे यांना अटक केली आहे. या घटनेने वैद्यकीय क्षेत्रात खळबळ उडाली आहे.