...अन् ते चार डॉक्‍टरच झाले पॉझिटिव्हचे निगेटिव्ह

 doctor became negative before positive in kolhapur
doctor became negative before positive in kolhapur
Updated on

कोल्हापूर - दोन दिवसांपूर्वी राजर्षी शाहू वैद्यकीय महाविद्यालयाच्या शेंडा पार्क येथील प्रयोगशाळेत चार डॉक्‍टरांचा कोरोनाचा अहवाल पॉझिटिव्ह आला होता; पण आज याच डॉक्‍टरांचा खासगी प्रयोगशाळेतील अहवाल मात्र निगेटिव्ह आला. छत्रपती प्रमिलाराजे रुग्णालयात यापूर्वी काही रुग्णांच्या बाबतीत घडलेला हा प्रकार थेट डॉक्‍टरांच्या बाबतीतच घडल्याने प्रयोगशाळेतील अहवालाविषयीच संभ्रमावस्था निर्माण झाली आहे.

कोरोना कक्षात गेले काही महिने प्रशिक्षणार्थी म्हणून काम करणाऱ्या चार डॉक्‍टरांच्या स्वॅबची बुधवारी (ता. ५) तपासणी केली. त्यात या चौघांचेही अहवाल पॉझिटिव्ह आले. या चारही डॉक्‍टरांना कोरोनाची कोणतीही लक्षणे नव्हती, तरीही चौघांनाही अतिदक्षता विभागात उपचारासाठी दाखल केले. डॉक्‍टर आपल्याला लक्षणे नाहीत असे सांगत असताना त्यांना अतिदक्षता विभागात दाखल केले.

लक्षणे नसल्याने या चारही डॉक्‍टरांनी आपले स्वॅब शहरातील एका खासगी प्रयोगशाळेत पाठवले. त्याचा अहवाल आज सायंकाळी आला. त्यात हे चौघेही निगेटिव्ह आले; तोपर्यंत डॉक्‍टरांना मनःस्तापाला सामोरे जावे लागले.

संपादन - धनाजी सुर्वे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com