Ramdas Athawale : रिपब्लिकन ऐक्यासाठी रामदास आठवले सत्तेतून बाहेर पडणार; डॉ. गवईंचा मोठा गौप्यस्फोट

‘रिपब्लिकन पक्षाच्या सर्व गटांचे ऐक्य व्हावे, यासाठी आपण प्रथमपासूनच प्रयत्न करीत आहोत.'
Ramdas Athawale
Ramdas Athawaleesakal
Summary

'गवई गट शिर्डी, सातारा, अमरावती लोकसभा मतदारसंघात निवडणूक लढविण्यास इच्छुक आहेत. सर्वच ठिकाणी गवई गटाचे उमेदवार उभे केले जातील.’

कोल्हापूर : ‘भारतीय रिपब्लिकन पक्षाचे (Republican Party of India) विविध गट एकत्र करण्याचा आमचा प्रयत्न आहे. त्यासाठी ॲड. प्रकाश आंबेडकर, रामदास आठवले (Ramdas Athawale) आणि जोगेंद्र कवाडे यांना अध्यक्षपदही देण्यासाठी आम्ही तयार आहोत. रिपब्लिकनचे ऐक्य टिकावे, यासाठी रामदास आठवले सत्तेतून बाहेर पडण्यासही तयार असल्याचे त्यांनी मला सांगितले असल्याचा गौप्यस्फोट डॉ. राजेंद्र गवई (Dr. Rajendra Gavai) यांनी केला.

कोल्हापुरात झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. आगामी लोकसभा निवडणुकीच्या (Loksabha Election) पार्श्वभूमीवर पक्ष संघटन आणि बळकटीकरणाची चाचपणी करण्यासाठी भारतीय रिपब्लिकन पक्षाचे नेते आणि राज्य सरचिटणीस डॉ. राजेंद्र गवई गेल्या तीन महिन्यांपासून राज्यव्यापी दौरा करीत आहेत.

Ramdas Athawale
Loksabha Election : लोकसभेसाठी 'हा' उमेदवार डोळ्यासमोर ठेवूनंच आमचं काम सुरू; मुश्रीफांनी कोणाचं घेतलं नाव?

ते म्हणाले, ‘रिपब्लिकन पक्षाच्या सर्व गटांचे ऐक्य व्हावे, यासाठी आपण प्रथमपासूनच प्रयत्न करीत आहोत. मात्र, त्यामध्ये प्रत्येक गटाच्या नेत्यांच्या आशा-अपेक्षा आडव्या येत आहेत. त्यावर उपाय म्हणून आपण आरपीआयचे अध्यक्षपद प्रकाश आंबेडकर, रामदास आठवले, जोगेंद्र कवाडे यांना देण्यास तयार आहे. या प्रस्तावाला रामदास आठवले यांनी तत्त्‍वतः मान्यता दर्शविली असून, प्रसंगी आरपीआयच्‍या ऐक्यासाठी सत्तेतून बाहेर पडण्याचीही तयारी दर्शविली आहे.’

Ramdas Athawale
Prakash Abitkar : मेहुण्या-पाहुण्यांतील वाद पुन्हा उफाळला; आमदार आबिटकरांविरोधात कोण? राधानगरीत जोरदार हालचाली

ॲड. प्रकाश आंबेडकर यांच्याबद्दल गवई म्हणाले, ‘त्यांना महाविकास आघाडी जागा वाटपावरून झुलवत आहे. त्यांना सहा जागा देण्याचे महाविकास आघाडीने ठरविले आहे. यातही आंबेडकर समाधानी नसतील तर त्यांनी आपल्या गटाबरोबर युती करावी. गवई गट शिर्डी, सातारा, अमरावती लोकसभा मतदारसंघात निवडणूक लढविण्यास इच्छुक आहेत. सर्वच ठिकाणी गवई गटाचे उमेदवार उभे केले जातील.’ पत्रकार परिषदेला पांडुरंग कांबळे, पंडित ठोमके, निवास सडोलीकर, भीमराव कांबळे यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com