
कोल्हापूर : तीस वर्षांपूर्वी संशोधन करून डॉ. सुस्मिता मोहन गाडगीळ यांनी तयार केलेल्या शोथघ्न लेपगोळीला नुकतेच भारत सरकारचे पेटंट मिळाले आहे. करट, गळूपासून मुक्ती मिळविण्यासाठी ही गोळी उपयुक्त ठरणारी आहे. अंबाई टँक परिसरात राहणाऱ्या डॉ. गाडगीळ या वयाच्या पंचाहत्तरीमध्ये देखील आरोग्य सेवा देत आहेत.