सकाळ वृत्तसेवा
कोल्हापूर : येथील अंबाबाई, जोतिबा मंदिरात भाविकांसाठी आता ड्रेसकोड लागू करण्यात आला आहे. दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांना मंदिर परिसरात तोकडे कपडे घालून येण्यास मनाई करण्यात येणार आहे. पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीने याबाबत प्रसिद्धीपत्रक जाहीर करत भाविकांना सुचनाचे पालन करुन सहकार्य करण्याचे आवाहन केले आहे.