Kolhapur Market :शेवग्याची एक शेंग थेट ३० रुपयांना; कोल्हापूर बाजारात ६०० रुपये किलोने दरवाढीचा भडका
Drumstick prices hit ₹600 per kg : थंडीच्या तीव्रतेमुळे शेवग्याच्या फुलांची गळती वाढल्याने स्थानिक उत्पादन घटले असून कोल्हापूर बाजारात शेवग्याची शेंग थेट ३० रुपयांवर पोहोचली आहे
कोल्हापूर : शेवग्याची एक शेंग ३० रुपयाला असून, ६०० रुपये किलोपर्यंत दर येऊन ठेपला आहे. या शेवग्याची बंगळूर आणि उत्तर कर्नाटकातून सध्या आवक सुरू असून, स्थानिक पातळीवर शेवग्याचे पीक कमी प्रमाणात आले आहे.