₹143 Crore Estimated for Remaining Dudhganga Canal Work
esakal
कसबा सांगाव : महाराष्ट्र कृष्णा खोरे विकास महामंडळाच्या दूधगंगा कालवे प्रकल्प - एककडून वर्ष १९९५ पासून सुरू झालेले दूधगंगा डाव्या कालव्याचे काम अद्यापही अपूर्णच (Kasaba Sangaon Kagal Canal Work) आहे. एकूण एक ते ७६ किमी अंतराचे काम पूर्णत्वास कधी जाणार असा सवाल उपस्थित होत आहे. दरम्यान, संबंधित विभागाच्या सांगण्यानुसार १ ते ६५ कि.मी. म्हणजेच कागलपर्यंतच्या अंतराचे काम पूर्ण झाले आहे. कसबा सांगाव ते कागल पंचतारांकित औद्योगिक वसाहती दरम्यान कालव्याच्या पुलाचे बांधकाम जवळपास दोन वर्षांपासून रखडले आहे.