अडचणींमुळे कोल्हापूर जिल्ह्यात कारखान्यांचे धुराडे नोव्हेंबरमध्येच पेटणार

 Due to the difficulties, the chimneys of the sugar factories will be lit in November
Due to the difficulties, the chimneys of the sugar factories will be lit in November

सिद्धनेर्ली ः राज्य शासनाने साखर कारखाने सुरू करण्यासाठी पंधरा ऑक्‍टोबरपासून परवानगी दिली आहे. मात्र कोल्हापूर जिल्ह्यातत लांबलेला परतीचा पाऊस, ऊस तोडणी दरवाढीसाठीचे मजुरांच्या आंदोलनावर न निघालेला तोडगा व कोरोना संसर्ग आदी कारणांमुळे कारखान्यांची धुराडी पेटण्यास नोव्हेंबर महिना उजाडण्याची शक्‍यता आहे. 
राज्यासह जिल्ह्यात यंदा समाधानकारक पाऊस झाला आहे. त्यामुळे ऊस पीक जोमाने वाढल्याने ऊसाची उत्पादकता वाढणार आहे. गेल्या तीन- चार हंगामाच्या तुलनेत या गळीत हंगामात ऊस क्षेत्र जादा लागवड झालेले आहे. त्यामुळे गाळपास उपलब्ध होणारे ऊसाचे प्रमाणही वाढणार आहे. त्याचे गाळप वेळेत होण्यासाठी राज्य शासनाने साखर कारखाने पंधरा ऑक्‍टोबरपासून सुरू करण्यासाठी परवानगी दिली आहे. कारखादारांची इच्छा असून देखील नैसर्गिक परिस्थितीमुळे या तारखेला कारखाने सुरू होऊ शकत नाहीत. 
जिल्ह्यामध्ये अपवाद वगळता अजून एकाही कारखान्याचा बॉयलर पेटलेला नाही. बहूतांशी कारखान्यांचे बॉयलर ऑक्‍टोबर महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात पेटतील. त्यामुळे अपवाद वगळता जिल्ह्यातील बहुतांशी सर्वच कारखानदार कारखाने नोव्हेंबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यामध्ये सुरू करण्याच्या मानसिकतेत आहेत. 
यंदा दिवाळी पंधरा नोव्हेंबरला आहे. त्यामुळे दिवाळीपूर्वी मजूर कामावर लावण्याच्या दृष्टीने कारखानदारांना दसरा सणानंतर ऑक्‍टोबर अखेर ते जास्तीत जास्त नोव्हेंबर महिन्याच्या पहिल्या आठवडा कारखाना सुरू करण्यासाठी योग्य वाटतो. 15 ऑक्‍टोबरला कारखाने सुरू करण्यामध्ये ऊस तोडणी मजुरांचे दरवाढीसाठी सुरू असलेल्या आंदोलनावर अद्याप तोडगा निघालेला नाही.तसेच गतवर्षीचा हंगाम संपताना उदभवलेले कोरोना संसर्गाचे संकट आता आणखीच गडद झाले आहे. त्यामुळे ऊस तोडणी मजुरांच्या जिल्ह्यातून मजूर स्थलांतरित होण्यास कितपत प्रतिसाद देतात. हे सुद्धा महत्त्वाचे ठरणार आहे. 
एकंदरीतच शासनाने जरी 15 ऑक्‍टोबरला कारखान्यांचे गळीत हंगाम सुरू करण्यास परवानगी दिली असली तरी जिल्ह्यामध्ये अपवाद वगळता कारखान्यांची धुराडी पेटण्यास नोव्हेंबर महिना उजाडण्याची शक्‍यता आहे. काही मोजके कारखाने या तारखेला सुरू झाले तरी त्यांना या सर्व अडचणींचा सामना करावा लागणार आहे. 

असे आहेत अडथळे 
राज्य शासनाने साखर कारखान्यांचे गळीत हंगाम सुरू करण्यासाठी 15 ऑक्‍टोबरपासून परवानगी जरी दिली असली तरी कोल्हापूर जिल्ह्यात मध्ये सुरु असलेला परतीच्या पावसामुळे प्रत्यक्ष शेतात ऊस तोडणी योग्य घात नाही. ऊस तोडणी दरवाढीसाठी मजुरांच्या सुरू असलेल्या आंदोलनावर तोडगा निघालेला नाही. एकरकमी एफआरपीसाठी शेतकरी संघटनेचे आंदोलन, असे अडथळे गळीत हंगाम पंधरा तारखेला सुरू करण्यामध्ये आहेत. 

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com