
Pollution Kolhapur : कोल्हापूर शहरासह परिसरात गुरुवारी झालेल्या अतिवृष्टीमुळे पंचगंगा नदीत मोठ्या प्रमाणात प्लास्टिक कचरा वाहून राजाराम बंधारा येथे जमा झाला. प्लास्टिकच्या बाटल्या, पिशव्या, थर्मोकॉल असा तब्बल ५० टन कचरा येथे अडकला. महापालिकेने स्वच्छता मोहीम राबवून बंधारा परिसर प्लास्टिकमुक्त केला. शहरातही सहा टन कचरा वाहून येऊन ठिकठिकाणी अडकला. गुरुवारी सायंकाळी महापालिकेच्या सर्व विभागांचे सुमारे एक हजार कर्मचाऱ्यांनी युद्ध पातळीवर यंत्रणा लावून हा कचरा काढला. त्यामुळे तुंबलेल्या पाण्याचा निचरा होऊन रस्ते रिकामे होऊन वाहतूक सुरळीत झाली.