
-पंडित कोंडेकर
इचलकरंजी : इचलकरंजी महापालिकेला स्थापनेपासून शासनाकडून जीएसटी प्रतिपूर्ती अनुदान मिळालेले नाही. नोव्हेंबरअखेर तब्बल १००९ कोटी इतके अनुदान शासनाकडून येणे बाकी आहे. निव्वळ जीएसटी यादीत नाव नाही म्हणून हे अनुदान रखडले आहे. परिणामी इचलकरंजी महापालिकेचा आर्थिक डोलारा कोसळण्याची भीती आहे.