
-कुंडलिक पाटील
कुडित्रे : जिल्ह्यात जुलै २०२४ या कालावधीमध्ये अतिवृष्टी, पूर व गारपीट जोरात झाली. यामुळे शेती पिके व फळ पिकांचे नुकसान झाले होते. नुकसानीचा अहवाल शासनास सादर केला होता. त्यानुसार महसूल व वन विभागाकडून शासन निर्णयानुसार ३० सप्टेंबर २०२४ ला एक लाख ६२ हजार ८०५ बाधित शेतकऱ्यांना १२२ कोटी २४ लाख इतका निधी मंजूर झाला होता.