राज्यात उद्यापासून ई-पास रद्द; 'हे' राहणार बंद अन् 'हे' राहणार सुरू   | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

E pass cancel in maharashtra from tomorrow

राज्य शासनाने आज लॉकडाऊन चार ची घोषणा करताना हे नवीन प्रणाली जाहीर केली आहे. 

राज्यात उद्यापासून ई-पास रद्द; 'हे' राहणार बंद अन् 'हे' राहणार सुरू  

कोल्हापूर : राज्यात सर्वाधिक त्रासदायक ठरत असलेली ई-पास प्रणाली राज्य शासनाने रद्द केली आहे. या निर्णयामुळे एका जिल्ह्यातून दुसऱ्या जिल्ह्यात किंवा राज्यात जाण्यासाठी कोणतीही परवानगी किंवा ई पासची गरज असणार नाही. राज्य शासनाने आज लॉकडाऊन चार ची घोषणा करताना हे नवीन प्रणाली जाहीर केली आहे. 

दरम्यान, शाळा, महाविद्यालये, विविध कोचिंग क्‍लासेस यांच्यासह चित्रपटगृहे, जलतरण तलाव, करमणूक केंद्र, बार यांच्यावरील बंदी 30 सप्टेंबरपर्यंत कायम ठेवली आहे. 

त्याश्‍यक आणि महत्वाचे
- कामाच्या ठिकाणी, वाहतूकीवेळी मास्क अत्याश्‍यक 
- सार्वजनिक ठिकाणी सामाजिक सहा फुटांचे अंतर बंधनकारक 
- दुकानात पाच व्यक्तिपेक्षा जास्त लोकांना प्रतिबंध 
- सभा-समारंभांना बंदी कायम 
- लग्नासाठी 50 तर, अत्यंविधीसाठी 20 लोकांना परवानगी 
- सार्वजनिक ठिकाणी थुंकल्यास दंड व शिक्षा 
- सार्वजनिक ठिकाणी मद्यपान, गुटखा, तंबाखू सेवनास बंदी 
- सार्वजनिक ठिकाणाहून बाहेर पडताना सॅनिटायझर, स्क्रिनिंग सक्तीचे 
- दुकान आणि लोकसंपर्क असणाऱ्या ठिकाणी सॅनिटायझर फवारणी बंधनकारक 
- 65 वर्षावरील व्यक्ति, गर्भवती महिला, दहा वर्षाखालील मुलांना घरात रहावे लागणार 
 

  प्रतिबंधित क्षेत्रासाठी 
- 19 मे 2020 चे नियम व अटी कायम करण्यात आल्या आहेत. 

 हे बंद राहणार 
- शाळा, महाविद्यालये, क्‍लासेस 30 सप्टेंबरपर्यंत बंद 
- चित्रपटगृहे, जलतरण तलाव, करमणूक केंद्र (मॉल आणि मार्केटसह) 
- आंतरराष्ट्रीय विमानसेवा, मेट्रो रेल्वे बंद 
- सार्वजनिक, राजकीय, क्रीडा, करणमणूक, सांस्कृतिक कार्यक्रमांवर बंदी 
- यापूर्वी अत्यावश्‍यक सेवेच्या दुकानांन दिलेली परवानगी कायम. 

हे पण वाचा - स्वत:च्या डोळ्यासमोर कोणाचा बाप, कोणाची आई, कोणाच्या मुलीचा मृत्यू होत होता पण.... 

  हे सुरु राहणार : 
- मद्य विक्री केंद्र 
- सर्व प्रकारची दुकाने 
- हॉटेल आणि लॉज शंभर टक्के सुरु करण्यास परवानगी 
- सर्व शासकीय कार्यालये पूर्ण क्षमतेने सुरु राहणार 
- खासगी कार्यालयात 30 टक्के उपस्थिती 
- केशकर्तनालये, ब्युटी पार्लर नियम-अटींसह सुरु 
-नियम अटींसह खासगी बस सुरू राहणार

हे पण वाचा - दादा गुरवार हाय खोटं बोलत नाही,  मावशी तुम्ही बरोबर आहात, अजिबात माघार घेऊ नका


गुन्हा आणि दंड : 

- अफवा पसरविणाऱ्यांवर गुन्हा दाखल होणार 

संपादन - धनाजी सुर्वे 
 

Web Title: E Pass Cancel Maharashtra Tomorrow

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
टॅग्स :Kolhapur
go to top