esakal | आंतरराज्य प्रवासासाठी असा काढा 'ई पास'

बोलून बातमी शोधा

null
आंतरराज्य प्रवासासाठी असा काढा 'ई पास'
sakal_logo
By
राजेश मोरे :

कोल्हापूर: कोरोना संसर्गाची साखळी तोडण्यासाठी राज्यात संचारबंदी लागू करण्यात आली आहे. याकाळात अत्यावश्‍यक कारणासाठी आंतरराज्य प्रवासाची मुभा देण्यात आली आहे. पण त्यासाठी ई-पास काढणे बंधनकारक राहणार आहे. कोविड 19 महापोलिस संकेतस्थळावरून ऑनलाईन हा पास काढता येण्याची सुविधा जिल्हा पोलिस प्रशासनाने उपलब्ध करून दिली आहे.

ई पास काढण्याची प्रक्रिया

ई पास काढण्यासाठ सर्वप्रथम http://covid19.mhpolice.in/ या संकेतस्थळाला भेट द्या. त्यानंतर येथे apply for pass here या पर्यायावर क्‍लिक करावे. पुढे तुम्हाला ज्या जिल्ह्यात प्रवास करायचाआहे, तो जिल्हा निवडावा. आवश्‍यक कागदपत्रे जोडावीत. प्रवास करण्यासाठीचे अत्यावश्‍यक कारणही नमुद करावे. कागदपत्रे अपलोड करताना सर्व माहिती तपशील एकाच डॉक्‍युमेंटमध्ये घेऊन तो अपलोड करावा. अर्ज केल्यानंतर तुम्हाला एक टोकण आयडी देण्यात येईल. तो सेव्ह करून अर्ज नेमक्‍या कोणत्या प्रक्रीयेत आहे, हे पाहू शकता. थोडक्‍यात या माध्यमातून तुम्हाला अर्जाचा स्टेटस तपासता येईल. पडताळणी आणि आवश्‍यक विभागांची परवानगी मिळाल्यानंतर तुम्ही तोच टोकन आयडी वापरुन ई- पास डाऊनलोड करु शकता.

- या ई पासमध्ये संबधिताची माहिती, वाहनाचा क्रमांक, पासचा वैधता कालावधी आणि क्‍यूआर कोड असेल.

- प्रवास करतेवेळी पासची मुळ प्रत आणि त्याची सॉफ्ट कॉपीही सोबत ठेवा. जेणेकरुन पोलिसांनी विचारलं असता त्यांना हा पास दाखवता येऊ शकतो.

*ई- पाससंदर्भातील महत्त्वाचे मुद्दे*

- घरातील व्यक्तीचा विवाहसोहळा, घरातील व्यक्तीचा अंत्यविधी आणि अत्यावश्‍यक आरोग्य आणिबाणी या कारणांसाठी ई-पास मिळवता येऊ शकतो.

- अत्यावश्‍यक सेवांतील कर्मचाऱ्यांसाठी आंतरराज्यीय आणि जिल्हांतर्गत प्रवासासाठी ई- पासची आवश्‍यकता नाही.

- अत्यावश्‍यक सेवा जसे बॅंक, एटीएम, किराणा दुकान, भाजीपाला यांना शहरांतर्गत परवानगी दिली आहे यांना ई -पासची परवानगी लागणार नाही.

- कोणतीही व्यक्ती किंवा त्यांचा समूह या पाससाठी अर्ज करु शकतो.

- ज्यांना ऑनलाईन सेवेसाठीचा ऍक्‍सेस मिळत नाही, अशा व्यक्तींनी सदर प्रक्रियेसाठी नजीकच्या पोलीस स्थानकाला भेट द्यावी. जिथं त्यांना मदत मिळेल.

Edited By- Archana Banage