
Kolhapur Silver City Hupari : अंमलबजावणी संचालनालय (ईडी) विभागाच्या अधिकाऱ्यांनी काल(ता.२०) पहाटे चारच्या सुमारास येथील महावीरनगरमधील निधी बँक, शेअर बाजार तसेच चांदी व्यवसायाशी संबंधित असलेल्या एका व्यक्तीच्या कार्यालयावर छापा टाकून चौकशी केली. सुमारे पंधरा तास चौकशी सुरू होती.