
Kolhapur City Expansion News : कोल्हापूर शहराची हद्दवाढ झालीच पाहिजे याबाबत सर्वांचे एकमत आहे. त्यामुळे उद्या (ता.३) मंत्रिमंडळाच्या बैठकीत हद्दवाढीबाबतच्या आज झालेल्या बैठकीतील मुद्द्यांची माहिती देऊ. तसेच आठ दिवसांत मुख्यमंत्र्यांची सर्व लोकप्रतिनिधींसोबतची बैठक बोलावण्यासाठी प्रयत्न करणार आहे. त्यात हद्दवाढीचा निर्णय घेण्यासाठी चर्चा घडवून आणली जाईल, असे पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांनी सांगितले.