

गडहिंग्लज : कडगाव (ता. गडहिंग्लज) येथे गडहिंग्लज-गारगोटी मार्गावर रस्ता पार करणाऱ्या एका वृद्धाला अनोळखी वाहनाने धडक दिली. त्यात गंभीर जखमी सखाराम कृष्णा पाटील (वय ७०, रा. कडगाव) यांचा उपचार सुरू असताना मृत्यू झाला. बुधवारी (ता. १६) रात्री साडेसातच्या सुमारास ही घटना घडली.