'गोकुळच्या आगामी निवडणुकीत मी सत्ताधारी गटासोबत राहणार'

election of gokul satyajit sarudkar with dominant party in kolhapur
election of gokul satyajit sarudkar with dominant party in kolhapur
Updated on

कोल्हापूर : गोकुळच्या आगामी निवडणुकीमध्ये सत्ताधारी गटात बरोबरच राहणार असून महाविकासआघाडी दूषित झाल्याने आपण हा निर्णय घेत असल्याचे आज (26) येथे माजी आमदार सत्यजित पाटील यांनी जाहीर केले. यावेळी सत्ताधारी गटाचे प्रमुख आमदार पी. एन. पाटील व महादेवराव महाडिक यांच्या उपस्थितीत होते.

सत्यजित पाटील म्हणाले, मी महाविकास आघाडीमध्ये पहिल्यांदा गेलो. त्यावेळी मला प्रमुख नेत्यांनी काही आश्वासने दिली होती. मात्र महाविकास आघाडीची घोषणा करण्याच्या आदल्या रात्री वेगळ्याच घडामोडी घडल्या व जनसुराज्यला घेवून घोषणा केली. येथेच आघाडी दुषित झाली.

कार्यकर्त्यांना हे अजिबात आवडले नाही. त्यामुळे माझ्यावर कार्यकर्त्यांचा प्रचंड दबाव होता. शेवटी आज ठराव धारक व प्रमुख कार्यकर्त्यांशी चर्चा केल्यानंतर कोणत्याही परिस्थितीमध्ये महाविकासआघाडी मध्ये न जाण्याचा निर्णय घेण्यात आला.

यावेळी प्रमुख उपस्थित बांधकाम व आरोग्य सभापती हंबीरराव पाटील,पं.स.सभापती विजय खोत, शिवसेना उपजिल्हाप्रमुख नामदेव गिरी, डी.जी.पाटील, अॅड. विजय पाटील (उत्रे), किरण पाटील (कोडोली), उत्तम पाटील(माले), प्रकाश पाटील (कोतोली), माणिक पाटील(सातवे) आदी प्रमुख उपस्थित होते.

"सत्यजित पाटील यांना नेहमीच सत्ताधारी आघाडीत सन्मानाचे स्थान राहीले आहे व यापुढेही राहील. विरोधकांनी कितीही देव पाण्यात ठेवले तरी गोकुळ कोणी हिरावून घेऊ शकत नाही, हा माझा शब्द आहे."

- मा. आ. महादेवराव महाडिक

"सत्यजित पाटील यांची शाहूवाडी पन्हाळ्यातील ताकद पाहता त्यांनी सर्वानुमते घेतलेला निर्णय निश्चितच सत्ताधारी आघाडीची ताकद वाढवणारी बाब आहे. त्यांचा योग्य सन्मान राखला जाईल."

- आमदार पी. एन. पाटील

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com