esakal | एकही निवडणूक जिंकली नाही तरी झाले सरपंच
sakal

बोलून बातमी शोधा

एकही निवडणूक जिंकली नाही तरी झाले सरपंच

माणगांववासियांनी सामुदायिक राजकारणाचा एक नवा आयाम निर्माण केला आहे.

एकही निवडणूक जिंकली नाही तरी झाले सरपंच

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

हातकणंगले : आपल्या हयातीत माणगांव ग्रामपंचायतीच्या १५ सार्वत्रिक निवडणुका लढवून एकदाही यश मिळाले नसल्याने माणगांव (ता. हातकणंगले) येथील ९० वर्षीय ज्येष्ठ नागरिक बापू पिरा कांबळे यांना त्यांच्या प्रयत्नांच्या प्रित्यर्थ आठ दिवसांच्या सरपंचपदाने सन्मानित करत माणगांववासियांनी सामुदायिक राजकारणाचा एक नवा आयाम निर्माण केला आहे.

हेही वाचा: आरोग्याच्या दुर्लक्षातूनच वाढले मानसिक आजार

बापू कांबळे यांना माणगावचे सरपंच म्हणून १५ तारखेपर्यंत सरपंच पदाचा मान देऊन तसे निवडपत्र देऊन त्यांचा आज माणगावमध्ये सत्कार केला. त्यांनी सरपंचपदाचा कार्यभार स्वीकारला. सरपंच राजू मगदूम, उपसरपंच अख्तर भालदार, ग्रामपंचायत सदस्य आदी उपस्थित होते. फटाक्यांची आतषबाजी केली. निवडीनंतर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.

loading image
go to top