esakal | ब्रेकिंग : मंत्री, खासदार, आमदार पुत्रांना उमेदवारी
sakal

बोलून बातमी शोधा

ब्रेकिंग : मंत्री, खासदार, आमदार पुत्रांना उमेदवारी

ब्रेकिंग : मंत्री, खासदार, आमदार पुत्रांना उमेदवारी

sakal_logo
By
निवास चौगले

कोल्हापूर : कोल्हापूर जिल्हा दूध उत्पादक संघाच्या (गोकुळ) निवडणुकीसाठी आज विरोधी राजर्षी शाहू शेतकरी विकास आघाडीच्या उमेदवारांची घोषणा पालकमंत्री सतेज पाटील, ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ आदिंच्या उपस्थितीत झाली. गेल्या निवडणुकीत उमेदवारी दिलेल्या बिनीच्या शिलेदारांना डावलून यावेळी मंत्री हसन मुश्रीफ यांचे पुत्र नाविद, खासदार संजय मंडलिक यांचे पुत्र विरेंद्र, आमदार राजेश पाटील यांच्या पत्नी व खासदार मंडलिक यांच्या भगिनी सौ. सुश्‍मिता, माजी आमदार के. पी. पाटील यांचे पुत्र रणजित पाटील, माजी आमदार संजीवनीदेवी गायकवाड यांचे पुत्र कर्णसिंह, माजी आमदार कै.यशवंत एकनाथ पाटील यांचे पुत्र अमरसिंह यांना उमेदवारी देऊन घराणेशाहीलाच प्राधान्य दिले आहे.

दरम्यान, पाच वर्षापुर्वी झालेल्या निवडणुकीसह गेली पाच वर्षे 'गोकुळ' च्या सत्ताधाऱ्यांविरोधात रस्त्यावर उतरून लढणाऱ्या शेतकरी कामगार पक्षासह बाळासाहेब कुपेकर, विजयसिंह मोरे, किरणसिंह पाटील, जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष सतिश पाटील, माजी सदस्य मधूकर देसाई, किशोर पाटील आदिंना यांना ठेंगा दाखवण्यात आला आहे. गेल्या निवडणुकीत विरोधी आघाडीचे उमेदवार असलेल्या तब्बल 12 जणांना यावेळी उमेदवारी नाकारण्यात आली. गेल्यावेळी महिला गटातून उमेदवार असलेल्या श्रीमती संजीवनीदेवी गायकवाड यांच्याऐवजी त्यांचे पुत्र कर्णसिंह यांना उमेदवारी देण्यात आले. मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी ज्यांच्यासाठी नेत्यांना फोन केला त्या माजी आमदार डॉ. सुजित मिणचेकर यांनाही अनसुचित जाती प्रवर्गातून उमेदवारी देण्यात आली आहे.

पॅनेल असे -

सर्वसाधारण गट - विश्‍वास पाटील (आबाजी), अरुण डोंगळे, शशिकांत आनंदराव पाटील चुयेकर, बाबासाहेब श्रीपती चौगले, अजित नरके, नावेद मुश्रीफ, करणसिंह गायकवाड, विरेंद्र मंडलिक, नंदकुमार ढेंगे, अभिजित तायशेटे, प्रकाश रामचंद्र पाटील, रणजित के. पी. पाटील, विद्याधर गुरबे, एस.आर.उर्फ संभाजी रंगराव पाटील, महाबळेश्‍वर शंकर चौगले, किसन बापुसो चौगले.

  • इतर मागासवर्ग - अमरसिंह यशवंत पाटील.

  • अनुसुचित जाती जमाती - डॉ.सुजित मिणचेकर,

  • भटक्‍या विमुक्‍त बयाजी देवू शेळके

  • महिला प्रतिनिधी- सुश्‍मिता राजेश पाटील, अंजना रेडेकर

loading image