Factory Election : शिवसेनेचे खासदार संजय मंडलिकांची बिनविरोध निवड; निवडणुकीतून 'इतक्या' उमेदवारांनी घेतली माघार

या निवडणुकीत विद्यमान ९ संचालकाना पुन्हा संधी मिळाली आहे.
Sadashivrao Mandlik Sugar Factory in Hamidwada
Sadashivrao Mandlik Sugar Factory in Hamidwadaesakal
Summary

उमेदवारांनी माघार घेतल्याने कारखान्याचे अध्यक्ष खासदार संजय मंडलिक (Sanjay Mandlik), संभाजी मोरे, तुकाराम ढोले हे बिनविरोध निवडून आले.

कागल : हमिदवाडा येथील लोकनेते सदाशिवराव मंडलिक कागल तालुका सहकारी साखर कारखान्याच्या (Sadashivarao Mandlik Sugar Factory) संचालक मंडळाची पंचवार्षिक निवडणूक बिनविरोध झाल्याचे स्पष्ट झाले आहे. या निवडणुकीत विविध गटांसाठी ४७ जणांनी उमेदवारी अर्ज दाखल केले होते.

यापैकी १९ जणांनी काल माघार घेतली आहे. २१ जागांपैकी १८ उमेदवार बिनविरोध झाले. उत्पादक गट मूरगूड यामध्ये ५ पैकी २ उमेदवारांनी माघार घेतल्याने कारखान्याचे अध्यक्ष खासदार संजय मंडलिक (Sanjay Mandlik), संभाजी मोरे, तुकाराम ढोले हे बिनविरोध निवडून आले.

उत्पादक गट बोरवडे या गटामध्ये ७ पैकी ४ उमेदवारांनी माघार घेतल्याने आनंदा फराकटे, कृष्णा शिंदे, सत्यजित पाटील हे बिनविरोध निवडून आले. उत्पादक गट कागल या गटामध्ये ४ पैकी १ उमेदवाराने माघार घेतल्याने धनाजी बाचणकर, शिवाजीराव इंगळे, महेश घाटगे हे बिनविरोध निवडून आले. उत्पादक गट मौजे सांगाव या गटामध्ये ६ पैकी ३ उमेदवारांनी माघार घेतल्याने कैलास जाधव, प्रकाश पाटील, मंगल तुकान हे बिनविरोध निवडून आले.

Sadashivrao Mandlik Sugar Factory in Hamidwada
Loksabha Election : उदयनराजेंचं टेन्शन वाढलं; 'हा' नवा पक्ष विरोधात लढणार निवडणूक, राष्ट्रवादीचंही असणार आव्हान

उत्पादक गट कापशी सेनापती या गटामध्ये ७ पैकी ४ उमेदवारांनी माघार घेतल्याने पुंडलिक पाटील, विश्वास कुराडे, प्रदीप चव्हाण हे बिनविरोध निवडून आले. तर बिगर उत्पादक संस्था गट यामध्ये २ पैकी एका उमेदवाराने माघार घेतल्याने विरेंद्र संजय मंडलिक हे बिनविरोध निवडून आले.

Sadashivrao Mandlik Sugar Factory in Hamidwada
Satara Politics : 'या' सर्व निवडणुका काँग्रेस, वंचित आघाडी एकत्र लढणार; माजी मुख्यमंत्र्यांसोबत पुढील बैठक

अनुजाती व जमाती या गटामध्ये २ पैकी एका उमेदवाराने माघार घेतल्याने चित्रगुप्त प्रभावळकर हे बिनविरोध विजयी झाले. भटक्या जाती व जमाती या गटामध्ये २ पैकी एका उमेदवाराने माघार घेतल्याने विष्णु बुवा हे बिनविरोध निवडून आले. तर महिला व इतर मागासवर्गीय गटातील उमेदवारांनी अद्याप माघार घेतली नसली तरी आज मंगळवारी हे दोन्ही गट बिनविरोध होण्याची शक्यता आहे.

या निवडणुकीत विद्यमान ९ संचालकाना पुन्हा संधी मिळाली आहे, तर ८ विद्यमान संचालकांनी या निवडणुकीतून माघार घेतली आहे. तसेच ९ नवीन चेहऱ्यांना संधी मिळाली आहे. तर महिला गटातील २ व इतर मागासवर्गीय १ जागा बिनविरोध होण्याच्या प्रतीक्षेत आहेत.

Sadashivrao Mandlik Sugar Factory in Hamidwada
Rishikant Shinde : राष्ट्रवादीत गद्दारी, पक्षांतर्गत कुरघोड्यांमुळंच मी शिवसेनेत प्रवेश केला; शिंदेंच्या भावाची कबुली

91 वर्षे वयाचा संचालक

या निवडणुकीत कृष्णा दत्तात्रय शिंदे (वय ९१) यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला होता. दिवंगत सदाशिवराव मंडलिक यांच्या राजकीय कारकीर्दीच्या सुरूवातीपासून शिंदे हे निष्ठावंत आहेत. त्यांनी आजवर कोणत्याही पदाची अपेक्षा गटाकडून केली नव्हती. यावेळी मात्र श्री. शिंदे यांनी मी मंडलिकांचा निष्ठावंत आहे. ९१ व्या वर्षी मला सेवेची संधी द्यावी, अशी विनंती संजय मंडलिक व सुकाणु समितीपुढे केली. खासदार मंडलिक यांनी श्री. शिंदे यांची बिनविरोध निवड करून निष्ठेला प्रतिष्ठा दिली. ९१ व्या वर्षी मिळालेल्या या संधीचे सर्वत्र कौतुक होत आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com